पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी ज्वारी प्रतिक्विंटल 3,551 रुपये तर गहू प्रतिक्विंटल 3,411 सासवड उप बाजारामध्ये मोठी आवक सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड (ता. पुरंदर) येथील उप बाजारामध्ये धान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली, बुधवारी दि. 10 ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 3,551 रुपयाचा दर तर गहू प्रतिक्विंटला सर्वाधिक 3,411 रुपयाचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उप बाजारात वाघापूर, माळशिरस, परिंचे, वाल्हे, राजुरी, गराडे, दिवे, यास संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, असे धान्य विक्रीसाठी येत आहे. बुधवारी सासवड उप बाजारात एक नंबर प्रतीच्या ज्वारीला कमाल 3,551 रुपये तर दोन नंबर प्रतिच्या ज्वारीला किमान 2,200 रुपये तर सरासरी 2,875 रुपये प्रतिक्विंटला गहू कमाल 3,411 तर दोन नंबरला 2,151 रुपये तर सरासरी 2,781 रुपये प्रतिक्विंटला असा दर मिळाला असे समितीचे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले. यावेळी सभापती संदीप फडतरे, उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप ,देविदास कामठे, सुशांत कांबळे ,गणेश होले, भाऊसो गुलदगड, पंकज निलाखे, वामन कामठे, अनिल माने, अशोक निगडे, लिपिक विकास कांबळे यासह व्यापारी आर. के .टेडर चे रूपचंद काडगे, आर. आर. टेडरचे राजेंद्र जालिंद्रे, अविनाश महाजन, नंदकुमार महाजन, सत्यवान पवार, जितेंद्र महाजन, शैलेश विरकर, आदी उपस्थित होते. यासहनिरा बाजार समिती आवारात गुळाची आवक 213 बॉक्स म्हणजेच 43 क्विंटल असल्याची माहिती गुळ बाजाराची माहिती सहसचिव नितीन किकले, कृष्णा खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी दिली. यावेळी गुळ व्यापारी शांतीकुमार कोठडीया उपस्थित होते. उप बाजारातील धान्य आवक दर ,प्रतिक्विंटल पिक,किमान दर, कमाल दर ,सरासरी दर ज्वारी 2,200,3,551 2,875. गहू 2,151, 3,411, 2,781. बाजरी 1,700,3,150,2,425. हरभरा 4,300,5,700,5,000. तादुल 4,000,4,200,4,100. निरा बाजारातील गुळाची आवक आणि दर क्विंटलमध्ये किमान दर, कमाल दर, सरासरी दर गुळ 4,000, 4,150, 4,075.याची सव माहिती बाजार समितीचे सचिव मिलीद जगताप यांनी प्रतिनिधीला दिली आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments