पुरंदर तालुक्यातील सासवड शहरातील खाजगी रुग्णालयांची चौकशी झाली पाहिजे; ग्राहक हक्क संघर्ष समितीचे महेश राऊत यांची मागणी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड (ता. पुरंदर) शहरातील अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये अनियमितापणा असल्याचा आरोप ग्राहक हक्क संघर्ष समितीचे पुरंदर तालुका अध्यक्ष महेश राऊत यांनी केला आहे, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सासवड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे, राऊत यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे, शहरातील अनेक रुग्णालयांनी आवश्यक असलेले ना हरकत दाखले घेतलेले नाहीत, तसेच त्यांच्याकडे रुग्णांच्या वाहनासाठी योग्य पार्किंग व्यवस्था आणि रुग्णवाहिकेसाठी पुरेशी जागा नाही, याशिवाय दवाखान्यामध्ये पुरेशी अग्निशामन यंत्रणा उपलब्ध नाही, आणि काही रुग्णालयांमध्ये लिफ्टची ही सोय नाही, अतिदक्षता विभागातील डॉक्टरांच्या पात्रतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी बी एच एम एस आणि बी ए एम एस पदवीधारक डॉक्टर काम करत असून, त्यांनी आवश्यक असलेली पीजीडीईएमएस पदवी घेतली आहे की नाही याची चौकशी करण्यात यावी, तसेच अनेक रुग्णालयांमध्ये प्रशिक्षित परिचारिका ऐवजी दहावी- बारावी उत्तीर्ण महिला काम करत आहेत, रुग्णालयांमधून निघणाऱ्या वैद्यकीय कचऱ्याची योग्य विलेवाट लावली जाते की नाही, याचीही तपासणी केली पाहिजे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या मागण्याकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही महेश राऊत यांनी दिला आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments