पुरंदर तालुक्यातील शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसीत रांगोळी स्पर्धा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या स्थापना दिनानिमित्त शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी सासवड या ठिकाणी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी प्राचार्य डॉ. राजश्री चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने व उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, विविध विषयावर काढलेल्या आकर्षक व देखण्या रांगोळ्या मधून विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि कलात्मकता खुलून आली. संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रज्ञा जगताप, प्राध्यापक दिपाली जगताप व प्राध्यापक सुनीता बाठे यांनी केले. त्यांच्या प्रयत्नामुळे हा उपक्रम यशस्वी पार पडला.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments