वाघिरे महाविद्यालयाच्या आदित्य चौधरी व समीर जाधव यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती व सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय, केडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने केडगाव येथे संपन्न झालेल्या आंतर महाविद्यालयीन आर्चरी मुले स्पर्धेमध्ये इंडियन राऊंड ह्या क्रिडाप्रकारात वाघिरे महाविद्यालय, सासवड येथील प्रथम वर्ष विज्ञान शाखेच्या आदित्य चौधरी व समीर जाधव या दोन खेळाडूंची सर परशुराम महाविद्यालय, पुणे येथे होणाऱ्या आंतर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दोन्ही खेळाडू प्रशिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत. सदर यशाबद्दल खेळाडूंचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पंडित शेळके, उपप्राचार्य डॉ.बी.यु.माने, डॉ.संजय झगडे, शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा. प्रितम ओव्हाळ यांनी अभिनंदन केले. तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या डॉ. प्रतिमा लोणारी, खेळाडू आदित्य चौधरी, समीर जाधव, पुणे विभागीय क्रीडा समिती खजिनदार डॉ.सुहास बहिरट यानी सुध्दा अभिनंदन केले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments