अत्रे प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील आदर्श विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षक हे प्रामाणिकपणे काम करीत असतात. त्यांच्या कामाची दखल घेऊन शिक्षण क्षेत्रातील आदर्श गुणवंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर यांच्या वतीने सासवड येथे (दि.१४) रोजी आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान , पुरंदर येथे सत्कार समारंभाचे आयोजन केल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय कोलते यांनी दिली. प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुणे महापालिका बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेश बनकर व महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखेचे अध्यक्ष ॲड.दिलीप निरगुडे असणार आहेत. यात माध्यमिक शिक्षक ३, प्राथमिक शिक्षक २, शिक्षकेतर कर्मचारी १, असे ६ शिक्षकांचा सन्मान होणार आहे. गेली २१ वर्षे प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार देऊन शिक्षकांना सन्मानित करण्यात येत आहे. यावर्षी श्री शिवाजी मराठा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पुणे २,जयश्री संतोष मोडक, डॉ.शंकरराव कोलते विद्यालय पिसर्वे.राजेंद्र सदाशिव वाघोले, पुरंदर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सासवड.भानुदास मारुती कटके , जिल्हा परिषद शाळा कुंभारवाडी, जेजुरी.शांगृधर कृष्णा कुंभार, जिल्हा परिषद शाळा,आंबळे.जयश्री धनंजय जगताप व शिक्षकेतर कर्मचारी महर्षी वाल्मिकी विद्यालय व जुनिअर कॉलेज वाल्हे.बापुराव किसनराव काकडे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती पुरस्कार समिती संयोजक बाळासो मुळीक यांनी दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments