Hot Posts

6/recent/ticker-posts

बाल विकास मंदिर शाळेत शिक्षक दिन उत्साहात*पालक संघाकडून कार्यक्रमाचे आयोजन सासवड बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पालक संघाकडून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील बाल विकास मंदिर शाळेत शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.५ सप्टेंबर हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस शिक्षक दिन म्हणून संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिक्षक हा भारताची भावी पिढी घडवत असतो त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बाल विकास मंदिर शाळेत पालक संघाकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन,डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. मुख्याध्यापक भाऊसो बडधे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शाळेत होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती, तसेच शाळा प्रगतीचा आलेख कसा उंचावत आहे आहे याविषयी माहिती त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून पालकांना दिली. तसेच पालक संघाने शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करून शिक्षकांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी, पालक संघाकडून शिक्षकांना भेटवस्तू, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सर्व शिक्षकांना अल्पोपहार देण्यात आला. डॉ. राकेश आत्राम, रुपाली धुमाळ यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.यावेळी, मुख्याध्यापक भाऊसो बडधे, मंजुषा चोरामले, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा विद्या टकले, बापू मुळीक, सीमा काळे, पूजा निगडे, शारदा यादव, नरेंद्र महाजन, माणिक शेंडकर, दिपक कांदळकर, पालक प्रतिनिधी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पालक प्रतिनिधी शीतल चिंबळकर आणि स्मिता कोलते यांनी केले. सुषमा कोलते यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments