Hot Posts

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान' कार्यशाळा दिवे येथे तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न सासवड प्रतिनिधी:,ता.9 :  बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज :                    दिवे (ता.पुरंदर) येथील श्री कातोबा हायस्कूलमध्ये मंगळवार (दि. 9) ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन आमदार विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक पुरंदर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ यांनी केले.पंचायत राज व्यवस्थेचे महत्त्व आणि शासनाच्या 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान' बाबत यशदाचे प्रवीण प्रशिक्षक जालिंदर काकडे यांनी मागर्दर्शन केले.विकसित महाराष्ट्र २०४७ उद्दिष्ट प्राप्तीसाठी पंचायत राज संस्था गतिमान करणे व त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभियानाची घोषणा करून गाव विकासाला चालना दिल्या बद्दल मुख्यमंत्री यांचे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी आभार मानले.ग्रामपंचायत कार्यकारिणी यांनी अभियानात उत्साहाने सहभागी होऊन उत्कृष्ट योगदान द्यावे व आपल्या गावाचा सर्वागीण विकास करावा. या अभियानात चांगले काम करणाऱ्या ग्रामपंचायतीना भरघोस बक्षीसे मिळणार असून तालुक्यातील ग्रामपंचायतीने राज्य स्तरावरील ५ कोटीचे बक्षीस मिळवण्यासाठी  प्रयत्नशील राहावे असे सांगितले.हे अभियान राबविल्यानंतर गावा गावात विकासा बाबत स्पर्धात्मक वातावरण तयार होणार असून लोकसहभाग व लोकचळवळीतून ग्रामविकासाचे उद्दिष्ट साध्य होणार आहे. पंचायत राज व्यवस्थेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन अभियान यशस्वी करावे असे आवाहन आमदार विजय शिवतारे यांनी केले. या अभियानात ग्रामपंचायत स्तरावर अपारंपारिक उर्जेचा वापर, वृक्ष लागवड,ग्रामस्वच्छता अभियान, एकल प्लास्टिक वापरास बंदी,घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन यांची  प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.तसेच ग्रामस्थांना तक्रार निवारण प्रणाली आणि विविध ऑनलाइन सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. कर वसुली, लोकवर्गणी आणि स्व-उत्पन्नावर भर देऊन गावांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचे उद्दिष्ट आहे.डिजिटल शाळा, रोजगाराच्या संधी व महिलांचे सक्षमीकरण या सारखे फायदे नागरिकां पर्यंत पोहचतील. उत्कृष्ट  व अति उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती कडून प्रेरणा घेवून इतर ग्रामपंचायत देखील आपली विकासाची दिशा व गती सुधारतील.गाव गावात विकासाची निकोप स्पर्धा निर्माण होऊन सुशासन प्रस्थापित होऊन गावाला आत्मनिर्भर बनविणे शक्य होणार असल्याचे पुरंदरच्या गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ यांनी सांगितले. चौकटग्रामपंचायतींसाठी पुरस्कार रचनाजिल्हास्तरावर प्रथम – 50 लाख रुद्वितीय – 30 लाख रु तृतीय – 20 लाख रु तालुकास्तरावर प्रथम – 15 लाख रुद्वितीय – 12 लाख रु तृतीय – 8 लाख रुविशेष पुरस्कार– प्रत्येकी 5 लाखया कार्यशाळेसाठी पुरंदर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ, हरिभाऊ लोळे, माजी जिल्हा परिषद सदस्या ज्योती झेंडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्तात्रेय काळे, राजेंद्र झेंडे,नितीन कुंजीर, धीरज जगताप यांच्यासह सर्व विभागाचे खाते प्रमुख, विस्तार अधिकारी, विविध ग्रामपंचायतींचे सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, केंद्रचालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन बाळासाहेब फडतरे यांनी केले तर पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी सागर कांबळे यांनी आभार मानले.                                 

Post a Comment

0 Comments