Hot Posts

6/recent/ticker-posts

राजुरी गावच्या उपसरपंच पदी मोनिका भगत यांची बिनविरोध निवड सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: राजुरी (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच सुधाकर भगत यांनी ठरलेल्या वेळेत राजीनामा दिल्याने, रिक्त पदासाठी निवडणूक घेण्यात आली, त्यावेळी एकमेव अर्ज आल्याने, मोनिका कमलाकर भगत यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा विद्यमान सरपंच इर्षा भगत यांनी उपसरपंच पदाची निवड जाहीर केली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक भाऊसो खंडाळे यांनी काम पाहिले. यावेळी पूनम गायकवाड, माधवी भालेराव ,पार्वती महानवर ,संपत चोरघडे, सुधाकर भगत हे ग्रामपंचायतचे सदस्य आदी उपस्थित होते. कैलास भगत माजी चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी यांच्या हस्ते त्यांचा म्हणजेच नुतन उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गावच्या सरपंच इर्षा भगत, अंकुश (बापू )भगत तंटामुक्ती अध्यक्ष, संभाजी (आबा )चव्हाण, भाऊसो खंडाळे ग्रामसेवक, भाऊसो भगत, संपत भगत, आप्पा भगत ,किसन भगत ,प्रकाश भगत, सुनील भगत, संदीप फिटर, नितीन भगत, संतोष भगत, रोहिदास भगत ,दादा भगत, कमलाकर भगत, दादा दोरगे ,तात्या गायकवाड, आजी, माजी ,सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, पोलीस पाटील, गावातील पदाधिकारी, युवा वर्ग ,जेष्ठ मंडळी, शेतकरी वर्ग, महिला मंडळ बहुसंख्येने आदी उपस्थित होते. गावातील जेष्ठ, सरपंच, उपसरपंच, माजी सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या असणाऱ्या योजना ,रस्ते, वीज, पाणी ,महिलांच्या मूलभूत गरजा, न्याय हक्काच्या प्रश्नासाठी माझ्या पदाच्या कार्यकालामध्ये सदैव प्रयत्नशील राहणार असून, शासनाच्या विविध योजना ,या तळागाळापर्यंत गावातील सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी, हक्कासाठी माझ्या पदाचा वापर करणार आहे ,विशेषता जेष्ठ मंडळी, शेतकरी, युवक, युवती, महिलांच्या मूलभूत गरजा अडचणीवर, सरपंच यांच्या सहकार्यातून प्रश्न अडचणी सोडविणार असल्याचे, नूतन उपसरपंच मोनिका कमलाकर भगत यांनी ही सर्व सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.

Post a Comment

0 Comments