यशवंत उर्फ (बिट्टू) भांडवलकर यांना जीवनगौरव पुरस्कार सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड( ता. पुरंदर) येथील जय मल्हार क्रांती संघटनेचे नेते व माजी नगरसेवक यशवंत उर्फ( बिट्टू) भांडवलकर यांना रविवार दि. सात रोजी आद्य क्रांति उमाजी नाईक यांच्या 234 व्या जयंतीनिमित्त भिवडी ता. पुरंदर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत (नाना )शितोळे, यांच्या उपस्थितीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन, सन्मानित करण्यात आले. यावेळी अंकुश जाधव, विकास उर्फ (बल्ली) भांडवलकर, अक्षय भांडवलकर, निलेश जाधव, माजी सरपंच सुशांत भांडवलकर,गंगाराम जाधव, पत्रकार: खंडू जाधव,अमृत भांडवलकर, बापू मुळीक आदी उपस्थित होते.या पुरस्काराबद्दल भांडवलकर यांचे पुरंदर तालुक्यामधून अभिनंदन होत आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments