पुरंदर तालुक्यामध्ये बांधकाम व्यवसायिकांना सवलती द्याव्यात ;अशी पुरंदर तालुका बिल्डर असोसिएशनची नगर परिषदेचे कडे मागणी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुका बिल्डर असोसिएशनने नगरपरिषद प्रशासनाकडे बांधकाम व्यवसायिकांना विविध सवलती देण्याची मागणी केली आहे, नगरपरिषद ,तहसील, प्रांत, जिल्हाधिकारी कार्यालय, भूमी अभिलेख या कार्यालयाकडून विविध परवानगी यांना होणारा विलंब आणि विविध व्यवसायिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे संघटनेने म्हटले आहे .सासवड तालुका पुरंदर येथे नुकत्याच झालेल्या बांधकाम व्यवसायिका यांच्या बैठकीत असोसिएशनचे अध्यक्ष बाळासो भिंताडे यांनी या समस्या मांडल्या होत्या. यावेळी बोलताना कार्याध्यक्ष अभिजीत जगताप यांनी सांगितले की, नगरपरिषद बांधकाम परवानगी पूर्णत्वाचा दाखला, नळ जोडणी, विद्युत यासारख्या कामासाठी खूप वेळ लागतो ,त्यामुळे व्यवसायिकांची मोठी भांडवली गुंतवणूक अडकून पडते ,त्यावर उपाय म्हणून प्रशासनाने सर्व दाखले वेळेत द्यावेत आणि करामध्ये टप्पे पाडून, सवलती द्याव्यात. रेरा परवानगी वेळेत मिळाल्यास ग्राहकांना वेळेवर घर देणे शक्य होईल, तसेच कामगार कल्याण उपकर मोठ्या प्रमाणात आकारला जात असून, त्या तुलनेत सुविधा मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. अनेक जण कर्ज काढून व्यवसाय करतात व प्रशासकीय बाबींमध्ये होणाऱ्या विलंबामुळे बँकेचे व्याज भरून, जेरीस येत आहे .त्यामुळे आर्थिक आणि मानसिक त्रास आला सामोरे जावे लागत असल्याचेही, जगताप यांनी सांगितले आहे. सचिव गणेश बांदल यांनी प्रशासनाने दर दोन महिन्यांनी समन्वय बैठक घेऊन, समस्यावर तोडगा काढण्याची सूचना केली, याशिवाय वाढलेल्या खंडणी खोरावर पोलिसांनी नियंत्रण ठेवावे, अशी मागणी ही त्यांनी केली. तर नाना कुंभा;रकर यांनीला फॉगिंग मशीन, वृक्षारोपण आणि कचरा संकलनासाठी मदत करण्याची तयारी दर्शवली, याप्रसंगी संतोष जगताप, विजय पुरंदरे, नाना काळे, दीपक चव्हाण आदी बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments