Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर विमानतळ राज्यात सर्वात मोठे तर; देशात दुसरा क्रमांक दोन धावपट्ट्या तयार करणार: जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या 3000 एकर जमिनीवर टर्मिनल आणि दोन धावपट्ट्यासाठी पूर्वीच्या आराखड्यानुसारच, सुमारे 2019 कायम ठेवली आहे, त्यामुळे क्षेत्रफळानुसार देशातील दुसरे तर राज्यातील सर्वात मोठे विमानतळ ठरणार आहे. मालाच्या साठवणूक इथून वाहतूक सुविधा देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या लॉजिस्टिक हबच्या जागेत कपात केली आहे .पुरंदर विमानतळासाठी सुरुवातीला सुमारे सात हजार एकर जमिनीचे संपादन करण्याचे नियोजन होते ,परंतु शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन, जिल्हा प्रशासनाने भूसंपादन क्षेत्रात चार हजार एकर क्षेत्र कपात करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे आता विमानतळासाठी 3000 एकर जमीन संपादित केली जाणार आहे, त्यात मूळ विमानतळा बरोबर लॉजिस्टिक हबचाही समावेश आहे. मात्र संपादन करण्यात येणाऱ्या जमिनीत सुमारे 60 टक्के कपात केल्यानंतर, मूळ विमानतळासाठी किती जमीन देण्यात येईल, याबाबत प्रश्न उपस्थित झाला होता, यासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी मनाले की, पूर्वीच्या आराखड्यानुसार, जमीन निम्म्याहून अधिक कमी केली असली तरी, विमानतळाच्या टर्मिनल धावपट्टीची जागा तीच कायम ठेवली आहे. यासाठी सुमारे दोन हजार एकर जागा वापरण्यात येणार आहे, लॉजिस्टिक हबच्या जागेत मोठी कपात केली आहे, लॉजिस्टिक हब मध्ये उद्योगाच्या मालाची साठवणूक दळणवळण निर्यात यासारखी कामे होतात, यात कंपन्यांना जागा दिली जाते ,तसेच भूसंपादनामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विकसित भूखंडासाठी सुमारे 300 एकर जागा राखीव ठेवण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments