पुरंदर तालुक्यामध्ये राजे उमाजी नाईक जयंती निमित्त सासवडमध्ये मिरवणूक सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती उत्सव मंडळ नाईक वाडा यांच्यावतीने सासवड येथे स्वातंत्र्यसंग्रामातील आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त सासवड शहरांमध्ये मिरवणुकीच्या आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीचे उद्घाटन जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत( नाना) शितोळे यांच्या हस्ते राजे उमाजी नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, राजे उमाजी नाईक यांना अभिवादन करण्यात येऊन, मिरवणुकीची सुरुवात झाली. यावेळी यशवंत भांडवलकर ,बदाम माकर, विकास भांडवलकर, अक्षय भांडवलकर, सुशांत भांडवलकर, लखन चव्हाण ,गंगाराम जाधव, साहेबराव जाधव आदी उपस्थित होते. त्यानंतर शिवतीर्थावर भाजप सासवड शहराध्यक्ष आनंद (भैय्या) जगताप, सासवडचे माजी उपनगराध्यक्ष संजय ग. जगताप, जयेद निकम, मयूर जगताप, ओंकार चव्हाण, विकास भांडवलकर, नवनाथ भांडवलकर, निलेश जाधव, लखन चव्हाण, अनिकेत बोर्डे, विशाल खोमणे, सुनील धिवार, गणपत शितकल, महेश वायदंडे आदी उपस्थित होते. मिरवणुकी दरम्यान, राजे उमाजी नाईक यांच्या क्रांतिकारी कार्याचा गौरव करत त्यांच्या बलिदानाला उजाळा देण्यात आला.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments