म्हाडाची 6,168 घरासाठी सोडत जाहीर; पुणे व पिंपरी चिंचवड शहर 31 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करता येणार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : पुणे पिंपरी चिंचवड शहर आणि पीएमआरडीए च्या हद्दीमध्ये 6,168 घरासाठी सोडत महाडाच्या पुणे विभागाच्या वतीने गुरुवार दि. 11 रोजी जाहीर करण्यात आली. या घरासाठी नागरिकांना 21 ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत अशी माहिती महाडा पुणे विभागाचे अध्यक्ष शिवाजी आढळराव पाटील यांनी दिली. म्हाडाच्या पुणे कार्यालयात सोडत काढण्यात आली, यावेळी महाडा पुणे विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल साकोरे उपस्थित होते, सोडतीमध्ये पुणे, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील सदनिकांचा समावेश केला आहे, यंदा सोडतीच्या संगणक प्रणालीच्या पारदर्शकतेमध्ये आणखी भर घालण्यात आली आहे, तसेच अर्ज भरण्याच्या बाबीमध्ये काही बदल केला आहे, त्यानुसार अर्जदार तसेच अर्जदारांच्या जोडीदारांचे आधार कार्ड ,पॅन कार्ड हे डीजी लोकर वरूनच प्राप्त करून घेणे गरजेचे आहे, त्याकरिता अर्जदारांसाठी नोंदणी करून आवश्यक माहिती अद्यावत करावी लागणार असल्याचे आढळराव पाटील यांनी यावेळी सांगितले आहे. म्हाडाच्या घराच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता अर्जदारांनी प्रथम www. housing. mahada. gov. in या संकेतस्थळावर भेट द्यावी, तसेच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावरील योजनांच्या सदनिकासाठी www. bookmayhome. Mhada. gov. in तसेच lottery. Mhada gov. या संकेतस्थळावर भेट द्यावी असे आव्हान साकोरे यांनी केले आहे. सोडतीची वेळापत्रक: ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची मुदत 31 ऑक्टोंबर, सोडतीसाठी अर्जाची प्रारूप यादी प्रसिद्ध अकरा नोव्हेंबर, दावे, हरकती दाखल करण्यासाठी अंतिम मुदत 13 नोव्हेंबर, सोडतीसाठी अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध 17 नोव्हेंबर, सोडत 21 नोव्हेंबर. अशी आहेत घरे: प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील सदनिकांची संख्या 1683, महाडा पीएमएवाय योजनेतील सदनिका 299, 15% 20% योजनेतील सदनिकांची एकूण संख्या 4186, पुणे महापालिका हददीतील सदनिका 1538, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील सदनिका 1534, पीएमआरडीए हद्दीतील सदनिका 1114.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments