पुरंदर तालुक्यामध्ये पुरोगामी संघर्ष परिषदेचे उपोषण सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड( ता. पुरंदर) येथील स्वराज्याचे शिलेदार यलोजी गोठे उर्फ येल्या मांग यांच्या समाधीच्या सासवड येथील गांधी मैदान परिसरातील जागेवरून, पुरोगामी संघर्ष परिषदेने गुरुवार दि. 11 पासून सासवड नगर परिषदेसमोर बे मुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. परिषदेच्या प्रमुख मागण्या येलोजी गोठे यांच्या समाधीसाठी सध्याच्या जागेवरच नवीन समाधी बांधावी आणि पुतळा उभा करावा, याबाबत नगर परिषदेने लेखी पत्र द्यावे, समाधीच्या जागेवर असलेल्या गाळाधारगावर atrayciti कायद्याखाली गुन्हा दाखल करावा किंवा तो गाळा नगर परिषदेने ताब्यात घ्यावा, समाधीची जागा बदलल्यास आंदोलनाचा इशाराही उपोषणकर्त्यांनी दिला आहे. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्राध्यापक सुभाष वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत असून, राज्य युवक अध्यक्ष मनोज भिसे यासह संदीप भोंडे, शेखर भोंडे, महादेव भोंडे, श्रीकांत भोंडे, सचिन भोंडे उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments