Hot Posts

6/recent/ticker-posts

स्वातंत्र्यसंग्रामातील आद्य क्रांतिकारक आणि पुरंदरचे सुपुत्र राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त सासवड शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: या मिरवणुकीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत राजे उमाजी नाईक यांच्या स्मृतींना अभिवादन केले.या प्रसंगी भाजपा सासवड शहराध्यक्ष आनंद जगताप, मा. उपनगराध्यक्ष संजयअण्णा जगताप, भाजपा सरचिटणीस जयेंद्र निकम, मयूर जगताप, अक्षय भांडवलकर, ओंकार चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मिरवणुकीदरम्यान राजे उमाजी नाईक यांच्या क्रांतिकारी कार्याचा गौरव करत त्यांच्या बलिदानाला उजाळा देण्यात आला.या कार्यक्रमाने नागरिकांमध्ये देशभक्ती आणि स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मिरवणुकीत सहभागी सर्वांनी राजे उमाजी नाईक यांच्या विचारांना आणि त्यांच्या स्वातंत्र्यलढ्याला मानवंदना दिली.

Post a Comment

0 Comments