पुरंदर तालुक्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रमाण कमी; तर सासवडमध्ये इच्छुकांना अर्ज भरण्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये अडचणी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर येथील नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी एक आणि नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक सात ब सर्वसाधारण जागेसाठी एक असे एकूण दोन अर्ज दाखल झालेले आहेत, हे दोन्ही उमेदवारी अर्ज जनमत विकास आघाडी कडून दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सतिश थेटे यांनी दिली. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस 10 नोव्हेंबर पासून सुरुवात झालेली असून, पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही, दुसऱ्या दिवशी 11 नोव्हेंबरला एक अर्ज दाखल झाला होता, या निवडणुकीसाठी इच्छुकानी गर्दी केली असतानाच, उमेदवारी अर्ज भरताना त्यांना निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाच्या समस्या आणि प्रशासकीय अडथळ्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अर्ज भरताना अचानक संकेतस्थळ बंद पडत आहे, किंवा बाहेर पडणे यामुळे एका अर्जासाठी दीड तास लागत आहे, जात वैधता प्रमाणपत्रासाठी संबंधित कार्यालयांमध्ये मोठी गर्दी झालेली आहे, पालिका प्रशासनाकडून शौचालय असणे आणि थकबाकी नसणे याबाबतचा दाखला दुपारी तीन नंतर मिळत असल्याने ,अर्ज भरण्यासाठी वेळ हुकत आहे, तसेच प्रभाग न्याय अंतिम मतदार यादी उपलब्ध नसल्यामुळे, उमेदवार आणि सूचकांचे अनुक्रमांक शोधताना अडचणी येत आहेत, सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्याकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते करीत आहेत. वार सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी सासवड नगरपालिकेत एकही अर्ज दाखल झाला नव्हता, तर दिनांक 11 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदासाठी जनमत विकास आघाडी सासवड तर्फे एक नाम निर्देशित पत्र दाखल उमेदवाराचे नाव घाटे दत्तात्रेय युवराज तसेच सात ब सर्वसाधारण या जागेसाठी जनमत विकास आघाडी सासवड तर्फे एक नामनिर्देशित पत्र दाखल उमेदवाराचे नाव कल्याणकर रवी नरसिंग यांचा दिनांक 12 नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल झालेला आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक डॉ. कैलास चव्हाण मुख्याधिकारी यांनी दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments