Hot Posts

6/recent/ticker-posts

45 शिक्षकांना तपासणीसाठी बोलवण्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा निर्देश सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: औंध येथे झालेल्या तपासणी दरम्यान, 45 शिक्षक अनुपस्थितीत होते त्याची तपासणी अद्याप पर्यंत नाही, त्या 45 शिक्षकांना पुन्हा तपासणीसाठी निर्देश डॉक्टर पवार यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना दिले आहेत. आरोग्यसेवा उपसंचालक डॉक्टर भगवान पवार यांच्या अध्यक्षतेखाली 16 ते 23 सप्टेंबर दरम्यान, जिल्हा बाहेरील तजनांच्या उपस्थितीत औंध येथील जिल्हा रुग्णालयात ही तपासणी पार पडली, या वैद्यकीय तपासणीमध्ये 150 शिक्षकांची तपासणी पूर्ण झाली असून, 46 शिक्षकांचे दिव्यांगत प्रमाण 40% पेक्षा कमी असल्याचे, निष्पन्न झाले आहे. त्यामुळे हे शिक्षक अपात्र ठरलेले आहेत, या शिक्षकाविरुद्ध दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अंतर्गत नियमित कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील निर्णय जिल्हा परिषद स्तरावर घेतला जाणार आहे, दरम्यान उर्वरित 250 शिक्षकांची तपासणी असून,ससून रुग्णालयाकडून अद्याप प्रलंबित आहे, या 250 शिक्षकांची ही फेर तपासणी करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी ससून प्रशासनाला दिले आहेत, त्याची तात्काळ तपासणी पूर्ण करून, गोपनीय अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर करण्याचे आदेश देखील पाटील यांनी ससून रुग्णालय प्रशासनाला दिले आहेत संबंधित शिक्षकांनी ससून रुग्णालयातूनच प्रमाणपत्र घेतल्याने, फेर तपासणी ही पुणे जिल्ह्याबाहेरील तज्ञ डॉक्टरांकडून इन कॅमेरा चित्रीकरणाद्वारे करण्याची मागणी प्रहार क्रांती आंदोलन संघटनेने केली आहे, तर पुरंदर तालुक्यामध्ये एक वर्ष झाले शिवरी येथील प्रभारी मुख्याध्यापिका उषा कामठे यांच्या विरोधामध्ये अख्या गावकऱ्यांनी त्यांच्या विरोधामध्ये शिवरी गावातील ग्रामस्थ त्यांनी पुरंदर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे सहा महिने ते एक वर्ष झाले या गोष्टीचा पाठपुरावा केला असून, त्या प्रकरणाच्या माध्यमातून पत्रकार यांच्यामुळेच समिती नेमली असताना, प्रभारी मुख्याध्यापिका उषा कामठे यांचा गावातील शाळेमध्ये हेकेखोरपणा, घमेंडपणा यापनामुळे त्यांनी कुणालाही जुमानलेले नाही, विस्तार अधिकारी यांना नाही, गटविकास अधिकारी यांनाही जु मानले नाही आणि गट शिक्षण अधिकारी यांना जुमानले नाही तरी या संदर्भात प्रभारी मुख्याध्यापिका उषा कामठे यांना त्वरित निलंबित करावे, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी यासंदर्भात निर्णय घ्यावा ,शिवरी ग्रामस्थ, सामान्य नागरिक, शेतकरी बांधव, महिला मंडळ यांची प्रमुख मागणी एक वर्ष झाली असताना, यावर समिती मधला निर्णय होऊन, त्या ठिकाणी कसल्याही परिस्थितीमध्ये प्रभारी मुख्याध्यापिका उषा कामठे यांना त्वरित निलंबित करावे, अशी मागणी शिवरी ग्रामस्था तर्फे केलेली आहे.

Post a Comment

0 Comments