Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेमध्ये जुन्या- नव्या चेहर्यामध्ये चुरस सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासह,11 प्रभागातून 22 नगरसेवक पदासाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना( शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस( अजित पवार गट), महाविकास आघाडी आणि काही अपक्ष उमेदवार यांचाही मोठ्या ताकतीने रिंगणात उतरलेले आहेत, यामध्ये 10 माजी नगरसेवक, तसेच चार माजी स्वीकृत नगरसेवकांचाही समावेश आहे, या निवडणुकीमध्ये काही जुन्या आणि अनुभवी चेहऱ्यासह अनेक नवीन चेहरेही नशीब आजमावत आहेत, यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून माजी नगराध्यक्ष आनंदी( काकी )जगताप, शिवसेनेकडून माजी नगरसेवक सचिन भोंगळे, तर नगरसेवक पदासाठी माजी उपनगराध्यक्ष अजित जगताप, मनोहर जगताप, सारिका हिवरकर, दिपक टकले, माजी नगरसेवक सोपान रणपिसे, डॉक्टर राजेश दळवी, विद्या टिळेकर, अस्मिता रणपिसे, पोखरणीकर तर माजी स्वीकृत नगरसेवक सचिन भोंडे, हरून बागवान, प्रवीण पवार, दिनेश भिताडे,लिना वढणे रिंगणात आहेत. एकूण 33 हजार 656 मतदार निवडणुकीसाठी सासवडमधील 33,656 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत, नगराध्यक्ष पदासाठी थेट जनतेतून तर 11 प्रभागातून 22 नगरसेवक पदासाठी ही निवडणूक होत आहे प्रत्येक प्रभाकात साधारण तीन ते साडेतीन हजार मतदार संख्या आहे, मयत दुबार आणि बाहेरगावी असलेली मतदार शोधून विजयासाठी आवश्यक मतांची जुळवणी करण्याची मोठी आव्हान उमेदवारासमोर आहे. सासवडच्या या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांची नेते रिंगणात असली तरी, काही प्रभागात अपक्ष उमेदवार ही डोके वर काढण्याची शक्यता आहे, एकंदरीत या निवडणुकीत काही जुन्या आणि अनुभवी चेहऱ्यासह अनेक नवीन चेहरेही नशीब आजमावत आहेत.

Post a Comment

0 Comments