पुरंदर तालुक्यातील श्रीनाथाच्या दर्शनासाठी श्री शेत्र वीर येथे 'सवाई सर्जाचं चांगभलं' चा जयघोष; तर वीर येथे गुलालाची उधळण सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्री शेत्र वीर ता. पुरंदर येथे कार्तिकी दर्शना निमित्त बुधवारी दि. 19 रोजी लाखो भाविकांच्या श्रद्धास्थान असणाऱ्या काशीखंड काळ भैरवनाथ अवतार श्रीनाथ मस्कोबा माता जोगेश्वरी यांच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती कार्तिकी दशॅ अमावस्या बुधवारी दि. 19 रोजी सकाळी 9: 43 वाजता चालू होऊन, गुरुवारी दि. 20 रोजी दुपारी 12:16 वाजता संपत आहे, येथे पहाटे चार वाजता पूजा होऊन, पाच वाजेपर्यंत मुख्य गाभारा तसेच देऊळ वाडा दर्शनासाठी खुला करण्यात आला ,पहाटे पाच ते सहा मुख्य गाभारा बंद करण्यात आला, सकाळी सहा वाजेपासून मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला झाला, त्यानंतर सकाळपासूनच देवस्थान ट्रस्ट व भाविका तर्फे देवाला अभिषेक करण्यात आला, सकाळी दहा वाजता देवाला भाविकांच्या दहिभातांच्या पूजा बांधण्यात आल्या, दुपारी बारा वाजता दुपारती होऊन, मुख्य गाभारा दर्शनासाठी बंद करण्यात आला, पुन्हा सव्वा एक वाजता श्री नाथाच्या दर्शनासाठी मुख्य गाभारा खुला करण्यात आला, दरम्यान, देऊळ वाड्यात दगडी कासवावर, सालकरी, गोसावी मंडळींचा पारंपारिक गोंधळाचा कार्यक्रम, दिवसभर सुरू होता, दोन दिवस अमावश्या असल्याकारणाने, अनेक भाविक येथे मुक्कामी आलेले होते, तर अनेक भाविकांनी नेहमीप्रमाणे कोडीत येथून श्री क्षेत्र विरला पाईवारी केली, तसेच काही भाविकांनी श्री क्षेत्र वीर येथील श्रीनाथाचे दर्शन घेऊन, श्री नाथाची मूळ स्थान श्री शेत्र गोडेउड्डाण येथेही दर्शन घेतले, त्यामुळे वीर आणि परिसर भाविकांनी गजबजलेला होता यावेळी रघुवीर सुमती तुकाराम तुरेकर व श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट वीर यांच्यामार्फत भाविकांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याची सोय, करून देण्यात आलेली होती .महाप्रसादाची आयोजन वामन फडतरे, भानुदास फडतरे व समस्त फडतरे परिवार यांच्यामार्फत करण्यात आले होते, तसेच वीज, जनरेटर, दर्शन बारी, वाहनतळ व्यवस्था, परिसर स्वच्छता, यासाठी देवस्थान सह,स्वयंसेवक, ट्रॅफिक पोलीस यांनी आयोजन केले होते, यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, विश्वस्त मंडळ, सल्लागार मंडळ,सालकरी, मानकरी, दागिनदार, गुरव, घडशी, पुरोहित ग्रामस्थ व भाविक आदी उपस्थित होते, कार्तिकी महिन्यात दोन दिवस अमावस्या असल्या तरी सकाळपासूनच भाविकांनी श्रीनाथाच्या दर्शनासाठी खूप गर्दी केलेली होती, आलेल्या सर्व भाविक भक्तांचे देवस्थान ट्रस्टमार्फत सर्व व्यवस्था करण्यात आली होती असे, श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टी चे अध्यक्ष यांनी ही माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments