पुरंदर तालुक्यातील तहसील कार्यालय पुरंदर व इतर सर्व शासकीय विभागाच्या संयुक्त विद्यमाने आडाची वाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराचे आयोजन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: छत्रपती शिवाजी महाराज महाराजसव अभियान समाधान शिबिरामध्ये महसूल विभाग, पुरवठा विभाग, संजय गांधी विभाग, पंचायत समिती विभाग, कृषी विभाग, सामाजिक वनीकरण, वन विभाग, भूमी अभिलेख विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, पशुधन विभाग, पाटबंधारे विभाग ,एम एम ई सी बी विभाग, सहकार विभाग, महिला व बालकल्याण विभाग, एसटी विभाग, बँक ऑफ महाराष्ट्र वाल्हे शाखा, अशा सर्व विभाग सहभागी या ठिकाणी झाले होते, सदर कार्यक्रमांमध्ये शासनाच्या विविध योजना अंतर्गत संदेश शिर्के उपजिल्हाधिकारी रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विक्रम राजपूत तहसीलदार पुरंदर, दिगंबर दुर्गाडे यांच्या शुभहस्ते विविध योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रीमियर, अपघात विमा योजना ,प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमांमध्ये सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडून उपस्थित नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन, त्याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले आहे .शिवाजी महाराज महाराजसव अभियान समाधान शिबिर कार्यक्रमांमध्ये सकाळी साडेदहा ते सायंकाळी पर्यंत नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन, शंका, समाधान करण्यात आले. तसेच स्थानिक नागरिकांचे उत्पन्नाचे दाखले, रेशन कार्ड, प्रतिज्ञापत्र व इतर अशा 503 प्राप्त अर्जांचा निपटारा करण्यात आला ,त्या अनुषंगाने मोजे आडाचीवाडी तालुका पुरंदर येथील छत्रपती शिवाजी महाराज महाराजसव अभियान समाधान शिबिरास आडाचीवाडी आणि वाल्हे परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सहभाग नोंदवला गेला आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments