पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद/ नगरपंचायती सार्वत्रिक निवडणुकीसाठी दुसऱ्या दिवशी राजगुरु नगरपरिषद दोन, जुन्नर नगरपरिषद एक, चाकण नगरपरिषद एक; तर सासवड नगरपरिषद एक दुसऱ्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून पहिला उमेदवार अजॅ सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद/ नगरपंचायती सार्वत्रिक निवडणुकीसाठी दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी या दिवशी दि. 11 रोजी राजगुरु नगर परिषदेसाठी सुनंदा बाळसो थिकले, सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक एक व महिला अपक्ष म्हणून, तर सविता अमोल सुक्रे, सर्वसाधारण महिला, 5अ महिला अपक्ष. जुन्नर नगर परिषदेसाठी हाफिक अब्दुल मुनाफ इनामदार सर्वसाधारण 3ब पुरुष अपक्ष. चाकण नगरपरिषद अनिता अनिकेत गोरे सर्वसाधारण महिला 1क महिला अपक्ष, तर सासवड नगर परिषदेसाठी युवराज दत्तात्रय घाटे सर्वसाधारण नगराध्यक्ष पदासाठी पुरुष अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी सतिश थेटे व सहाय्यक निवडणूक निणॅय अधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी ही माहिती दिली. सासवड नगर परिषदेची सर्वसाधारण गुरुवार या दिवसापासून फॉर्म भरण्यासाठी सासवड नगरपालिकेत चांगलीच रंगत येणार असल्याचे, चित्र स्पष्ट झालेले आहे. आज काही का होईना सासवड नगर परिषदेमध्ये दुसऱ्या दिवशी युवराज दत्तात्रेय घाटे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून पहिला उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे. याबाबत सविस्तर माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सतिश थेटे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments