Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यात पुणे विभागीय बॉल बॅडमिंटन स्पर्धा सासवड येथे संपन्न सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी व म. ए.सो.वाघिरे विद्यालय , सासवड यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित पुणे विभागस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धा दिनांक 10/ 11 /2026 रोजी प्रशालेच्या मैदानावर सुरू आहेत. या स्पर्धेत म. ए. सो. वाघिरे विद्यालय, सासवड - 17 वर्ष मुले या संघाने प्रथम क्रमांक मिळविला . व या संघाची सातारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बॉलबॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन म. ए .सो वाघिरे विद्यालयाचे शाला समितीचे अध्यक्ष, राहुल मिरासदार, तसेच प्रशालेचे महामात्र, सुधीर भोसले , प्रशालेच्या मुख्याध्यापिका पुजा जोग , उपमुख्याध्यापक शंतनु सुरवसे , पर्यवेक्षिका लडकत मॅडम तसेच क्रीडा कार्यालयाचे तालुका क्रीडा अधिकारी पालवे मॅडम तसेच पुणे बॉल बॅडमिंटन संघटने चे सचिव गोसावी डी. एस उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी खेळ व खेळाचे जीवनातील महत्व सांगितले .सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडाशिक्षक हिरामण सहारे गणेश खळदकर शंकर विभाड भाऊसो खुणे, संजय महाजन, मयूर जांभळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमा चे सूत्रसंचालन मच्छिंद्र फडतरे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय शिवहार लहाने यांनी केले तसेच प्रमुख पाहुण्यांचे आभार प्रशालेच्या पर्यवेक्षिका लडकत मॅडम यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments