आपले सरकार सेवा केंद्र महा-ई सेवा केंद्र संचालक तसेच आधार संचालक यांचा विविध मागण्यासाठी संप सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आपले सरकार सेवा केंद्र महा-ई सेवा केंद्र संचालक तसेच आधार संचालक यांचा विविध मागण्यासाठी दि. 12 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर पर्यंत तीन दिवसाचा संप पुकारत असल्याबद्दल, निवेदन सादर करताना विक्रम राजपूत तहसीलदार व उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांना निवेदन देण्यात आले, राज्यातील डिजिटल ई सेवा केंद्र मार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवेमुळे त्यांच्या वेळेची, श्रमाची, तसेच पैशाची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे, या कार्यात महा-ई सेवा केंद्र आणि आधार सेवा केंद्र यांचा 100% सहभाग असून, ते त्यांच्या माध्यमातून शासनाचा दरवर्षी सुमारे तीन ते चार हजार कोटी रुपयांची बचत होत आहे. डिजिटल भारत उपक्रमा अंतर्गत लाखो युवकांना रोजगार मिळवून, त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत आहे ,तरीसुद्धा आजपर्यंतच्या केंद्रांना शासनाकडून सापत्य अभावी वागणूक दिली जात आहे, परिणामी या केंद्रावर नेहमीच टागती तलवार लटकलेली आहे, तरी शासन सतत साप मुंग्याच्या खेळीत असून,केंद्र चालकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे, याच पार्श्वभूमीवर संघटनेचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात या संदर्भात रीटयाचिका दाखल केलेली आहे, त्यावर शासनाने अध्याप आपला दृष्टिकोन बदललेला नाही, त्यामुळे मागण्या या खालील प्रमाणे नवीन आपले सरकार सेतूचा जीआर बाबत पूर्ण तपासणी करून, आवश्यक ते फेरफार बदलावेत शासन निर्णय क्रमांक मातंस -048 /प्र क्र. 1/ 2025 दि. 2/ 6/ 2025 असून, नवीन सेतू देऊ नये. शासनाचे दि. 19 जानेवारी 2018 च्या शासन निर्णयानुसार महा-ई सेवा केंद्र व आधार केंद्राची संख्या मर्यादित ठेवावी. या मागण्या मान्य न झाल्यास राज्यातील सर्व महा-ई सेवा केंद्र व आधार केंद्र शासनाविरुद्ध असहकार आंदोलन करण्यात येणार आहे, असे अध्यक्ष, सचिव यांच्या वतीने करण्यात आले आहे. निवेदन देताना यावेळी विजय मोहिते पुणे जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली, मिथुन ढमाळ पुरंदर अध्यक्ष, प्रसाद पोतदार कार्याध्यक्ष, तुषार जगताप सचिव व सेतू कार्यालय व आधार केंद्र पुरंदर आदी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments