अखिल स्तरीय महा-ई सेवा व आधारित केंद्र संघटन महाराष्ट्र राज्य पुरंदर अध्यक्षपदी मिथुन ढमाळ तर सचिवपदी तुषार जगताप यांची नियुक्ती सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: अखिल स्तरीय महा-ई सेवा व आधार केंद्र संघटन महाराष्ट्र राज्य पुरंदर अध्यक्षपदी मिथुन नानासो ढमाळ यांची तर सचिव पदी तुषार बाळासो जगताप यांना नियुक्तीचे पत्र विजय मोहिते पुणे जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी महाधन उघडे प्रतिनिधी, किशोर अडसूळ निरीक्षक, योगेश राधवन संघटक, भिमराव आठवले सचिव पुणे जिल्हा यावेळी आधी उपस्थित होते. संघटनेचे अनुशासन आणि नियमाचे पालन करीत आपण अखिल स्तरीय महा-ई सेवा आधार केंद्र संघटन महाराष्ट्र राज्य संघटनेची बांधणी करून संघटना मजबूत करण्यासाठी आपल्या विभागातील केंद्र संचालकांच्या समस्यांचे निवारण कराल, या अपेक्षेने आपली नियुकती करत आहोत, असा विश्वास विजय मोहिते पुणे जिल्हा अध्यक्ष यांनी केला. तर संघटनेची अनुशासन व नियमाचे पालन करीत, अखिल स्तरीय महा-ई सेवा आधार केंद्र संघटन महाराष्ट्र राज्य संघटनेची पुरंदर तालुक्यात मजबूत करण्यासाठी, सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे असा विश्वास संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांना दिला असे, सुचित मिथुन ढमाळ अध्यक्ष व तुषार जगताप सचिव यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला व संघटनेच्या पदाधिकारी यांना दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments