पुरंदर तालुक्यातील सासवड पोलिसांची कोंबिंग ऑपरेशन; तर अवैध धंद्यावर कारवाई करीत 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड पोलिसांनी अवैध धंदेविरुद्ध कोंबिंग ऑपरेशन राबवले असून, खंडोबा नगर, झोपडपट्टी परिसर, असं जेजुरी नाका आणि लांडगे आली येथील अवैध धंद्यावर पोलिसांनी कारवाईचा बडगा उघरलेला आहे, याबाबत सोमवारी दि. 3 रोजी शहरातील अवैध धंद्यावर पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते, या विशेष पथकाने जेजुरी नाका आणि लांडगे आळी या दोन ठिकाणी सुरू असलेल्या ऑनलाईन बिंगो जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई करण्यात आली, जेजुरी नाक्यावर जुगार खेळविणारे सचिन विश्वास जाधव रा. इंदिरानगर यांच्यावर गुन्हा दाखल करून, 5,408 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तसेच लांडगे आळी येथे जुगार खेळविणाऱ्या राहुल प्रमोद बुद्धिवंत यांच्यावर गुन्हा दाखल करून, 76,840 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. या दोन्ही ठिकाणाहून एकूण 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम, यासह एक एपीआय, तीन पोलीस उपनिरीक्षक, दोन महिला उपनिरीक्षक, आणि एचडीपीओ कार्यालय व सासवड पोलीस ठाण्याचे एकूण 15 अमलदारांचा समावेश होता, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यावर अशाच प्रकारे कारवाई करून, त्याचे समूळ उछाटन करण्याचा, सासवड पोलीस दलाचा प्रयत्न राहील असे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी त्यांच्या आजूबाजूला जर कुठेही अवैध धंदे चालू असतील तर त्याची माहिती तात्काळ सासवड पोलिसांना द्यावी अशी माहिती देणारे चे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही आवाहन कुमार कदम यांनी केले आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
YouTube channel
Most Popular
FM RADIO 📻
FM Code
FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा
0 Comments