Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा 165 वा वर्धापन दिन एम.ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूल सासवड प्रशालेमध्ये उत्साहात साजरा सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: म.ए.सो. बारामती प्रशालेचे माजी उपमुख्याध्यापक मधुकर हेंद्रे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते .कार्यक्रमाची सुरुवात संस्थापकांच्या व सरस्वतीमातेच्या प्रतिमा पूजनाने झाली. या प्रसंगी इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी रुचिरा गार्डी यांच्या मार्गदर्शनाखाली म.ए.सो. गीत सादर केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भाऊसो येळे यांनी संस्थेचा इतिहास व वाटचाल याबाबत माहिती सांगितली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हेंद्रे सर यांनी संस्थापकांविषयी माहितीपर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगतात प्रशालेच्या माननीय मुख्याध्यापिका कल्पना खांडेकर - नागनूर यांनी विद्यार्थ्यांना संस्थेचे "क्रियाविण वाचाळता व्यर्थ आहे" हे ब्रीदवाक्य आपल्या जीवनात आत्मसात करण्याचा मोलाचा संदेश दिला. कार्यक्रमाचे नियोजन, सूत्रसंचालन व पाहुण्यांचा परिचय भाऊसो येळे व स्वाती पांढरे यांनी केले. कार्यक्रमासाठी पर्यवेक्षिका सरोज जांगडा, पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गीता प्रभुणे यांनी केले.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments