पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी 6 अर्ज वैध ;तर 22 जागांसाठी 71 उमेदवार रिंगणात सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज सासवड नगरपरिषद निवडणुकीच्या झालेल्या छाननीत नगराध्यक्ष पदाचे 9 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत, तर त्यामुळे 22 जागांसाठी 71 अर्ज उमेदवारी वैध ठरले आहेत ,एकूण 129 उमेदवार नगरसेवक पदासाठी रिंगणात होते, तर नगराध्यक्ष पदासाठी 15 उमेदवार रिंगणात होते, त्यातील नगराध्यक्ष पदासाठी 6 अर्ज वैध तर 58 उमेदवारांचे नगरसेवक/ नगरसेविका पदाचे अर्ज बाद झाले आहेत, सासवड नगरपरिषद नगराध्यक्ष व 22 जागांसाठी निवडणूक होत असून, उमेदवारी अर्जाची छाननी झाली असून, पुणे जिल्ह्यातील असणाऱ्या निवडणुका यांची छाननी झाली आहे, परंतु सासवड हा अपवाद तसाच छाननी मध्ये दि. 19 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता रिपोर्टिंग मिळाले आहे, याचाच प्रकार 16 नोव्हेंबर व 17 नोव्हेंबर रोजी निवडणूक माहिती वेळेवर मिळाली नाही, याकडे निवडणूक आयोग यांनी योग्य दखल घ्यावी, तसेच तीन दिवस झाले निवडणूक निर्णय अधिकारी याकडून योग्य वेळी माहिती मिळत नाही ,योग्य दखल घ्यावी ,पत्रकार यांची हेटाळणी होत असेल, तर सासवड नगरपरिषद मतदान, मोजणी व्यवस्थित पार पडू शकते का? हा तर प्रश्नचिन्ह आहेच, नगराध्यक्षपदासाठी उमेदवार :घाटे दत्तात्रय युवराज, भोंगळे सचिन सुरेश, धोत्रे निकिता राजेंद्र, जगताप वामन शिवाजी, जगताप आनंदी (काकी)चंद्रकांत, जगताप अभिजीत मधुकर. प्रभाग क्रमांक 1 अ हिवरकर सारिका हिरामण, होले नीलम सचिन, राऊत माधुरी तेजस. प्रभाग क्रमांक 1ब झेंडे जीवन दगडू, जगताप मनोहर ज्ञानोबा ,जगताप संतोष किसन, जगताप शुभम आनंद, जगताप मनोज गोपाळ. प्रभाग क्रमांक 2अ वढणे लीना सौरभ, टिळेकर अंजली लक्ष्मण, गिरमे ज्योती चंद्रकांत. प्रभाग क्रमांक 2 ब भिंताडे दिनेश शशिकांत, भिंताडे बाळासो बापूराव. प्रभाग क्रमांक 3अ भोंडे रेश्मा सचिन, भोंडे नंदा राहुल, सकट छाया आप्पा, भोंडे साधना राहुल ,भोडे शीतल प्रवीण. प्रभाग क्रमांक 3ब भोंडे रोहित महादू, माने सुरज चंद्रकांत, भोंडे सचिन दामू, जगताप जालिंदर श्रीरंग, जगताप महेश प्रकाश, जगताप ज्ञानेश्वर गुलाबराव, भोंडे महेश मारुती, कसबे राजेंद्र चंद्रकांत, गिरमे संजय निवृत्ती. प्रभाग क्रमांक 4अ माने अनिता पांडुरंग, रणपिसे सोपान एकनाथ. प्रभाग क्रमांक 4 ब जगताप स्मिता सुहास, जगताप प्रतीक्षा गणेश ,गिरमे सोनाली राजेंद्र .प्रभाग क्रमांक 5 अ मेत्रे रत्ना अमोल, मेत्रे अमृता दिगंबर, मेत्रे मोनिका मनोज, पडलवार चैताली बालाजी, टिळेकर ज्योती संजय. प्रभाग क्रमांक 5 ब गिरमे मंदार विजय, चौखंडे मयूर चंद्रकांत. प्रभाग क्रमांक 6अ जगताप अर्चना चंद्रशेखर, जगताप शिंदे ज्ञानेश्वर. प्रभाग क्रमांक 6 ब जगताप राजन चंद्रशेखर, जगताप अभिजीत गुलाबराव. प्रभाग क्रमांक 7अ टिळेकर विद्या श्रीकांत, जगताप स्मिता उमेश. प्रभाग क्रमांक 7 ब कल्याणकर रवी नरसिंग ,टकले वैभव बबनराव ,बागवान हरून हसन, पवार प्रवीण काळूराम, टकले दिपक दत्तात्रेय. प्रभाग क्रमांक 8 अ आतार अरिफ गुलाब , म्हेत्रे प्रितम सुधाकर, लांडगे सुहास दत्तात्रेय. प्रभाग क्रमांक 8 ब जगताप दिपाली अक्षराज, राऊत सुभाली संदीप. प्रभाग क्रमांक 9 अ भिंताडे मंगेश रमेश, राऊत प्रदीप काशिनाथ. प्रभाग क्रमांक 9 ब पोखरणीकर अस्मिता पंकज, सुभागडे निता उमेशकुमार, जगताप प्रियंका साकेत ,सुभागडे छाया सुनील. प्रभाग क्रमांक 10 अ पवार सुनील विनायक, पवार अतुल वसंत, गिरमे ज्ञानेश्वर साधू .प्रभाग क्रमांक 10 ब जगताप शिल्पा संदीप, सूर्यवंशी दिप्ती सुभाष .प्रभाग क्रमांक 11 ब जगताप अजित काळुराम, जगताप रोहित भरत ,दळवी राजेश विजय ,जगताप आकाश संजय. प्रभाग क्रमांक 11 इनामके हेमलता मिलिंद याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कुठलीही घोषणा केली नसताना, नगरपालिकेबाहेर जमाव ,जमवून फटाके वाजवले, जमाव केला आचारसंहिता भंग झाली असून, यावर कोणतीही घोषणा नसताना ,निवडणूक निर्णय अधिकारी याकडून माहिती मिळण्यास सासवड नगरपालिकेची दिरंगाई झाली असून, यावर 11अ मध्ये हा निर्णय प्रलंबित असताना, बाहेर फटाके, रात्री दि. 18 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता फटाके फोडण्यात नगरपालिकेच्या समोर आले,जमाव जमवल्याबद्दल आचारसंहितेचा भंग झाला असून, व निवडणूक निर्णय अधिकारी यांकडून माहिती तीन दिवस मिळण्यासाठी विलंब होत असताना, आज दि. 19 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता रिपोर्टिंग सासवड नगरपालिकेचे छाननी अर्ज केलेले झाले, तर या संदर्भात निवडणूक विभागाने त्या ठिकाणी त्वरित सासवड नगर परिषदेच्या संदर्भात निर्णय घ्यावा ,अशी सामान्य नागरिकांची व पत्रकारांची मागणी आहे. तर उमेदवार अजॅ माघार घेण्यास दि. 21 नोव्हेंबर आहे तर निवडणूक चिन्ह वाटप दि .25 नोव्हेंबर रोजी होणार आहे अशी माहिती निवडणूक सहाय्यक अधिकारी डॉ.कैलास चव्हाण यांनी ही माहिती दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments