Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील वाघिरेच्या कबड्डी संघास विजेते पद सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या संस्था क्रीडा महोत्सवाअंतर्गत हडपसर महाविद्यालयीन गटस्तरीय कबड्डीस मुली स्पर्धेत सासवड येथील वाघिरे महाविद्यालयाच्या संघाने विजेतेपद पटकावले, हडपसरच्या फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन सोमवारी दि. 17 रोजी येथील अण्णासाहेब मगर कॉलेजच्या मैदानावर करण्यात आले होते, स्पर्धेत वाघिरे महाविद्यालयाच्या संघाने सासवड येथील गोविंद रघुनाथ साबळे फार्मसी महाविख यालयावर सत्तावीस विरुद्ध सात असा गुण फरकाने विजय मिळवला. समीक्षा गायकवाड ,प्रीती जैनक, सायली दिघे आणि अपूर्वा गायकवाड यांनी उत्तम कामगिरी केली. विजयी संघास शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्राध्यापक प्रितम ओव्हाळ यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments