पुरंदर तालुक्यातील खानवडी शाळेला मान्यता सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाची निवासी शिक्षण देणारी सावित्री ज्योती इंटरनॅशनल स्कूलला शासनाची मान्यता मिळाली आहे, त्याचबरोबर 'सीबीएसई' बोर्ड कडूनही मान्यता मिळाली आहे, त्यामुळे शाळेसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून, देण्यासाठी ही 'सीबीएसई' संलग्न निवासी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, जिल्हा परिषदेकडून पहिल्यांदाच 'सीबीएसई' बोर्डाची शाळा सुरू करण्यात आली आहे, या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी बालवाडी ते इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे. खानवडीतील बारा एकर जागेत मंजूर नकाशाप्रमाणे सर्व बांधकाम टप्प्याटप्प्याने औद्योगिक क्षेत्राच्या सामाजिक उदरदायित्व निधीतून (सीएसआर) करण्यात आले आहे. दरम्यान ,मान्यतेसाठी जिल्हा परिषदेने शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता, त्यास मान्यता मिळाल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली. शाळेसाठी संस्थेबरोबर सांमजस्य करार करण्यात आला आहे. प्रवेश प्रक्रिया कधी सुरू करायची, कशा पद्धतीने करायची आहे, याबाबत जिल्हा परिषदेकडून विचार मंथन सुरू आहे, प्रवेश परीक्षा घेऊनच प्रवेश द्यायचा का? याबाबत लवकरच सर्व निर्णय घेतला जाईल, असेही गजानन पाटील यांनी सांगितले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments