पुरंदर तालुक्यातील जुन्या व नवीन मतदारांचा कौल नक्की भाजपला की शिवसेनेला? तर शहरात 33 हजार 656 मतदान पुरुष मतदान 16,818 व महिला मतदान 16,838 त्यासाठी विजयाचे दावे- प्रति दावे सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड नगर परिषदेच्या मतदार संख्या वाढल्यामुळे,11 प्रभागांमधून 22 सदस्य झाल्याने, तर नगराध्यक्ष पद हे थेट जनतेतून निवडले जाणार आहे, सासवडमध्ये एकूण मतदार संख्या 33 हजार 656 इतकी आहे, 2011 च्या जनगणनेनुसार 31,821 लोकसंख्या असताना, एससी 2,941 एसटी 5,23 असेच मतदान असताना, या वर्षी प्रभाग 1 मधून पुरुष 1,628 महिला 1,429 एकूण 3,057 प्रभाग क्रमांक 2 मधून पुरुष 1,009 महिला 9,28 एकूण 1,937 प्रभाग 3 मधून पुरुष 1,138 महिला 1,167 एकूण 2,305 प्रभाग 4 मधून पुरुष 8,27 महिला 1,807 एकूण 3,634 प्रभाग 5 मधून पुरुष 1,919 महिला 2,045 एकूण 3,964 प्रभाग 6 मधून पुरुष 1,700 महिला 1,725 एकूण 3,425 प्रभाग 7 मधून पुरुष 1,806 महिला 1,950 एकूण 3,756 प्रभाग 8 मधून पुरुष 1,512 महिला 1,428 एकूण 3,000 प्रभाग 9 मधून पुरुष 1,021 महिला 1,032 एकूण 2,053 प्रभाग 10 मधून पुरुष 1,539 महिला 1,535 एकूण 3,074 प्रभाग 11 मधून पुरुष 1,719 महिला 1,732 एकूण 3,451 यामध्ये प्रामुख्याने पुरुष 1 ते 11 मध्ये 16, 818 महिला 1 ते 11 मध्ये 16,838 एकूण 33 हजार 656 मतदार आहेत, या निवडणुकीत महिलांचे 50 टक्के आरक्षण असल्याने, 11 जागा या महिलासाठी राखीव आहेत, 22 पैकी 11 जागा महिलांसाठी आहेत, तर 11 जागा पुरुषासाठी, तर नगराध्यक्ष पदाची निवड जनतेतून होणार असल्याने, पुरंदरसह संपूर्ण महाराष्ट्रात उत्सुकता लागलेली आहे, की कोण नगराध्यक्ष सासवड नगरपालिकेचा होणार, 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत नगराध्यक्ष पदासाठी भाजप, शिवसेना, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी अजित पवार गट, महायुती, अपक्ष यामधून 15अर्ज नगराध्यक्ष पदासाठी आले आहेत ,तर यामध्ये प्रामुख्याने पंचरंगी लढत पाहण्यास मिळत असून, यामधील भाजप, शिवसेना, महायुती, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी अजित पवार गट ,अपक्ष यामधून खरी लढत ही भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट यांच्यातच खरी लढत पहावयास मिळेल, तर प्रभाग 1 ते 11 मध्ये, 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत 22 जागांसाठी 1,28 फॉर्म जमा झालेले आहेत ,तर सध्या तरी काम, व्यवसाय ,नोकरी, शिक्षण यासाठी सासवड शहरात पसंती दिली असून, पुण्याला जवळचे शहर म्हणून सासवडची ओळख आहे, तर विमानतळ, आयटी पार्क, गुंजवणी पाणी अशा सासवड शहरातील येणारे युवक, विद्यार्थी, कामगार यांचा ओढा, वाढल्याने शहराची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत चाललेली आहे, परिणामी स्पर्धकांची संख्या वाढल्याने, भाजपमध्ये उमेदवार इच्छुक असल्याने, नेतेमंडळीची पूर्णपणे भाजपच्या आदेशानुसारच, कार्यकर्ते काम करणार असल्याचा, सुतावाच बोलून कार्यकर्त्यांनी दाखवलेला आहे, त्यामुळे तर वाढलेली मते ही नक्की कुणाच्या पदरात पडतात, तर कोणाला फटका बसणार ?हे 25 नोव्हेंबर पासून प्रचाराला सुरुवात होऊन ,फक्त पाच दिवस प्रचार आहे, 2 डिसेंबरला मतदान असताना, खरी लढत ही सासवड नगरपालिकेमध्ये भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांच्यातच लढत होणार आहे, यासाठी सामान्य नागरिक यांना खूप उत्सुकता लागली आहे की सत्ता कुणाची येते व कुणाची जाते, हे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये स्पष्टपणे दिसून येईल.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments