Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेमध्ये चार ते पाच वर्षाच्या प्रशासक काळामध्ये निधी कमी झाल्याची खुद्द मंत्र्याचीच कबुली सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महाराष्ट्रातील 280 नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ 200 जागावर भाजपचा नगराध्यक्ष राहील असे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सासवड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भातील पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली, सासवड येथे निवडणूक प्रचारार्थ आयोजित दौऱ्यामध्ये पत्रकारांशी ते बोलत होते, स्थानिक कार्यकर्त्यांना संधी प्राप्त व्हावी, या हेतूने काही जागावर स्वतंत्र निवडणुकीचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तरीही युतीतील पक्षांनी एकमेकांवर चिखल फेक करायची नाही, असे ठरवण्यात आल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. चार ते पाच वर्षाहून अधिक काळ प्रशासन असल्याकारणाने, नगरपालिकांना निधीची कमतरता निर्माण झाली आहे, परिणामी अनेक विकास कामांना खिळ बसलेली असून, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याविषयी तथ्य असल्याचे ,सांगून आता हा विकासाचा अनुशेष म्हणून काढला जाईल, असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी सासवड येथे पत्रकार परिषदेमध्ये केले. यावेळी पत्रकार परिषदेसाठी माजी आमदार संजय जगताप, अशोक टेकवडे ,बाबाराजे जाधवराव, सासवड शहर अध्यक्ष आनंद( भैय्या )जगताप, विजय वढणे, भाजपचे असणारे सर्व सासवड नगर परिषदेतील उमेदवार, व त्यांचे बूथ कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रतिनिधी ,कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments