Hot Posts

6/recent/ticker-posts

वाघीरे महाविद्यालय, सासवड येथील ३६ महाराष्ट्र बटालियन च्या सात राष्ट्रीय छात्र सैनिकांची भारतीय सैन्य दलात भरती सासवड पतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: वाघीरे महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना (एन सी सी) विभाग विद्यार्थ्यांमध्ये शिस्तबद्धता, नेतृत्वगुण आणि राष्ट्रनिष्ठा विकसित करणारे सक्षम प्रशिक्षण केंद्र म्हणून ओळखले जाते. ३६ महाराष्ट्र बटालियनचे एनसीसी अधिकारी लेफ्टनंट गजेंद्र अहिवळे यांनी सांगितले की, भारतीय सैन्य भरती–२०२५ मध्ये महाविद्यालयातील सात कॅडेट्सनी आपल्या कठोर परिश्रम, निस्सीम समर्पण आणि सातत्यपूर्ण तयारीच्या जोरावर भारतीय सैन्य भरती–२०२५ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करून महाविद्यालयाचा सन्मान अधिक उंचावला आहे.सैन्यात निवड झालेल्या कॅडेट्सची नावे —जेयूओ निशांत धुमाळ, सीएसएम वैभव इजगुडे, एसजीटी दशरथ ठोंबरे, सीडीटी हर्षवर्धन भिंताडे, एसजीटी ज्ञानेश्वर यादव, एसयूओ सोहम गद्रे आणि सीडीटी ओंकार घुले. सर्वांनी अत्यंत कठोर प्रशिक्षण, नियमित शारीरिक तयारी आणि अभ्यासू वृत्ती दाखवून ही उल्लेखनीय कामगिरी केली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके म्हणाले,

Post a Comment

0 Comments