पुरंदर तालुक्यातील नगरपालिका प्रचारासाठी रात्री फक्त दहापर्यंतच परवानगी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषद निवडणुकी दरम्यान, शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, तसेच रात्री दहापर्यंतच प्रचार करता येईल, सभा मिरवणूक आयोजित करण्यासाठी किमान 48 तास आधी आणि जास्तीत जास्त पाच दिवस आधी परवानगी घेणे अनिवार्य आहे,असे आवाहन पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी केले. सासवड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी सतीश थेटे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण आणि पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी शनिवारी दि. 8 पालिका सभागृहात सर्व राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रिया, तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत मार्गदर्शन केले आहे. थेटे आणि डॉ. चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत सूचना दिल्या आहेत, तसेच शांततेत व पारदर्शकपणे निवडणूक पार पाडण्यासाठी सर्व स्तरावरून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. उमेदवारासाठी अनामत रक्कम खुला प्रवर्ग 1,000 रुपये महिला इतर प्रवर्ग 5,00 रुपये. पद निहाय खर्च मर्यादा रुपयात नगराध्यक्ष सात लाख 50 हजार सदस्य दोन लाख 50 हजार सोशल मीडियाचा वापर करताना जातीय, धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, वाद एकमेकांना आव्हान देणारे संदेश प्रसारित करू नयेत, उमेदवारांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारच्या गैरवर्तनापासून परावृत करण्याची आव्हान पोलीस निरीक्षक कदम यांनी केले आहे. सुचकासाठी सुचना नगराध्यक्ष पदासाठी सुचक शहराच्या कोणत्याही प्रभागातील मतदार असू शकतो, सदस्य पदासाठी सूचक हा उमेदवार उभा असलेल्या त्याच प्रभागातील मतदार यादीत असणे आवश्यक. एका मतदाराला फक्त एकदाच सूचक होता येईल, एकापेक्षा जास्त उमेदवारांना एकच मतदार सूचक असल्याचे आढळून आल्यास ते सर्व अर्ज बाद ठरविले जाणार.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments