Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील विमानतळाच्या मोबदल्याच्या रकमेवरून शेतकरी प्रचंड आक्रमक; तर सात बाधित गावातील शेतकऱ्यांनी एक प्रकारे विमानतळ नकोच असा सूर एकत्र केला सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय पुरंदर विमानतळासाठी संपादित जमिनीच्या बदल्यात शेतकऱ्यांना प्रति एकरी एक कोटी तीस लाख रुपयापर्यंत भरपाई देण्याचा प्रस्ताव असून, घर, गोठा,विहीर, कुपनलिका, जलवाहिनी तसेच फळझाडे व झाडे यासारख्या घटकासाठी त्यांच्या मूल्याच्या दुप्पट नुकसान भरपाई देण्याचा प्रस्ताव आहे असे, काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे पुणे येथे बोलताना सांगितले होते, या मोबदलेच्या रकमेवरून सात गावातील बाधित शेतकऱ्यांनी एक प्रकारे प्रचंड रोष असा व्यक्त केलेला आहे की, आम्हाला विमानतळ हे सात गावांमध्ये नको आहे, या प्रकारे सूर त्यांनी आळवला आहे. या विरोधामध्ये निवेदन देणार असून, शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा देखील दिलेला आहे. वनपुरी ता. पुरंदर येथे महालक्ष्मी हॉलमध्ये पुढील पिढीचे भविष्य व सामाजिक न्याय यांचा विचार करण्यात आलेला नाही असे, दिसून येत आहे. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता, कोणतेही निर्णय राहू नयेत, मोबदला देताना विकसित झालेल्या विमानतळ परिसरातील शेतकऱ्यांना 35 टक्के विकसित भूखंड आणि एफएसआय पाच मिळावा तसेच तो भूखंड कायमस्वरूपी, सातबारा तयार करून घ्यावा, भाडे करार किंवा इतर कोणत्याही अटी नसाव्यात, यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात स्वतःच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून, व्यावसायिक करता येईल अशा शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत, बाजारभाव रिंग रोड प्रमाणे द्यावा, रिंग रोड प्रकल्पासाठी जसे सात लाख ते दहा लाख रुपये प्रती गुंडा मोबदला दिला जात आहे, तसाच दर विमानतळ बाधित शेतकऱ्यांनाही मिळावा वेगवेगळे रेशन कार्ड, असलेल्या एकत्रित कुटुंबांना स्वतंत्र घरासाठी जागा द्यावी, एकाच घरात राहणारे परंतु कुटुंबाचे रेशन कार्ड वेगवेगळे असतील, तर त्या कुटुंबाला प्रत्येकी तीन गुंठे प्लॉट, जमीन घर बांधणीसाठी उपलब्ध करून घ्यावे, घराची नुकसान भरपाई सर्व घरांना सरसकट 2.5 पट नुकसान भरपाई द्यावी, जुने कच्चे बांधकाम असो वा नवीन सर्वसामान्य शेतकऱ्याला पक्के घर उभे करता यावे, अशा शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आहेत, तर आम्ही कुंभारवळण या ठिकाणची शेती फक्त संमती जमीन मोजणीसाठी दिलेली असून, विमानतळाला आमची जमीन अजिबात संमती देण्याची इच्छा नाही असे स्पष्ट वक्तव्य व इशारा उद्योगपती गणेश काशिनाथ मोरे यांनी केला आहे. आम्ही प्रकल्पग्रस्त शेतकरी असून, उद्योजक जर शेतकरी होऊ शकतो, तर शेतकरी उद्योजक का नाही होऊ शकत, त्यासाठी आत्ताच्या सरकारने आमच्यावर ही वेळ आणू नका विमानतळाची पुरंदर विमानतळाबाबत मोबदल्याच्या शेतकऱ्यांनी पोस्टद्वारे निषेध व्यक्त केलेला आहे. तुषार साधु झुरंगे उपसरपंच मुंजवडी अशा या शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आहेत त्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील सात बाधित विमानतळाच्या गावातील शेतकऱ्यांनी दिलेला आहे.

Post a Comment

0 Comments