Hot Posts

6/recent/ticker-posts

श्रीक्षेत्र वीर येथील स्मशानभूमीतील किळसवाणा प्रकार उघडकीसअर्धवट जळलेल्या प्रेतांचे कुत्रे तोडतायत लचके, नागरिकांच्यात संतापाची लाट सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्रीक्षेत्र वीर (ता, पुरंदर ) येथील स्मशानभूमीत किळसवाना प्रकार उघडकीस आला आहे. स्मशानभूमी मध्ये अंत्यविधी झाल्यानंतर अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे गावातील भटकी कुत्री लचके तोडताना आढळून आली आहेत. हा किळसवाना प्रकार गेली अनेक महिने चालू असून, नागरिकांच्यात मात्र या किळसवान्या प्रकाराबाबत दबक्या आवाजात उलट सुलट चर्चा चालू आहेत. वीर येथील स्मशानभूमी शेजारी एका बाजूला वाहनारी पूर्णगंगा नदी आहे, तर दुसऱ्या बाजूला समृद्धी बियर बार हॉटेल आहे. आणि दोन्हींच्या मध्ये वीरची स्मशानभूमी आहे. शेजारीच असणाऱ्या हॉटेलमधील टाकाऊ पदार्थ खाण्यासाठी भटक्या कुत्र्यांची येथे झुंबड उडालेली असते. टाकून दिलेले अनेक चिकन,मटन चे हाडके भटकी कुत्रे चगळत असल्याचे, अनेकांनी पाहिले आहे . तसेच हीच भटकी कुत्री शेजारील पाण्यामध्ये आपले शरीर बुडवून येऊन ते. थेट अंत्यविधीच्या लोखंडी चौकोनी स्टॅन्ड मध्ये येऊन, अर्धवट जळालेल्या मृत शरीराचे अवशेष घेऊन जात आहेत. त्यामुळे नातेवाईकांना आपल्या अंत्यविधी केलेल्या मृत नातेवाईकाच्या हस्ती कमी मिळताना दिसत आहे.त्यामुळे वीर आणि पंचक्रोशी मध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.आपल्या घरातील मृत व्यक्तीचे अंत्यविधी केल्यानंतर सावडण्याचा विधी तिसऱ्या दिवशी असतो त्यामुळे अनेकदा अंत्यविधी केल्यानंतर नातेवाईक फारसे स्मशानभूमीकडे फिरकत नाहीत.स्मशानभूमित प्रेतांचे प्रमाण वाढल्याने अस्थी घ्यायला येणाऱ्या लोकांना एकिकडे अस्थी मिळत नाहीत. दुसरीकडे अर्धवट जळलेल्या प्रेतांचे लचके कुत्रे तोडत असल्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस येत असताना ग्रामपंचायत मात्र डोळ्यावर पट्टी बांधून बसली आहे की काय अशी नागरिकांच्या चर्चा चालू आहे. तसेच श्रीक्षेत्र वीर येथील स्मशानभूमीसाठी नवीन अंत्यविधीसाठी ओटा उभारून पत्राचे शेड टाकण्यात आले आहे. परंतु हे उभारत असताना पत्र्याची, अँगल ची कॉलिटी सुमार दर्जाची असून, शेडची उंची ही कमी ठेवण्यात आली आहे या संदर्भातही नागरिकांच्या उलट सुलट चर्चा चालू आहेत.प्रेताची विटंबना होणे हा अतिशय संवेदनशील व भावना दुखावणारा प्रकार असल्यामुळे ग्रामपंचायतीने ताबडतोब वीर येथील स्मशानभूमीला तार कंपाऊंड करून गेटची व्यवस्था करावी. किंवा कंपाऊंड होईपर्यंत अंत्यविधी झाल्यानंतर ग्रामपंचायतचा एक कर्मचारी अंत्यविधी दिवशी संपूर्ण दहन होईपर्यंत त्याची तेथे नेमणूक करावी अशी नागरिकांची मागणी होत आहे.चौकट: आंधळा दळतंय,आणि कुत्र पीठ खातय. अशी ग्रामपंचायतची अवस्था......भटक्या कुत्र्याच्या संदर्भात नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक यांना वेळोवेळी कल्पना दिली आहे. या संदर्भात वृत्तप्रसिद्ध झाले असून भटक्या कुत्र्यांच्या त्रासाबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. श्रीक्षेत्र वीर मध्ये सरासरी 70 ते 80 भटकी कुत्रे असून यांनी अनेक लहान मुलांवरती हल्ला केला आहे. सकाळी चालायला जाणारानाही या कुत्र्यांचा त्रास होत आहे. ही भटकी कुत्रे आत्ता प्रेताचे लचके तोडताना दिसत आहेत. एखाद्या जिवंत माणसाचे लचके तोडल्यानंतर जीवित हानी झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे की काय? त्यामुळे आंधळं दळतय आणि कुत्र पीठ खातय, अशी वीर ग्रामपंचायतीची अवस्था झाली आहे.कोट: वीर येथील स्मशानभूमीतील अनेक महिने चाललेल्या प्रेताच्या विटंबनेबाबत आम्हाला कुठलीही कल्पना नव्हती. आता चार दिवसांपूर्वी माझी व सरपंचांची स्मशानभूमीतील किळसवाण्या प्रकाराबाबत चर्चा झाली असून, या संदर्भात लवकरच योग्य त्या उपाययोजना केल्या जातील असे वीर चे ग्रामविकास अधिकारी प्रसाद सोले यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments