निलंबनाबाबत महसूल मंत्री आज संघटनेची चर्चा करणार तर तोडगा न निघाल्यास काम बंद आंदोलन सुरूच राहणार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी 10 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निलंबना विरोधात पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या पाचही जिल्ह्यात कामकाज ठप्प झाल्यानंतर ,आता राज्य सरकार झुकले असून, यावर तोडगा काढण्यासाठी गुरुवार दि. 18 रोजी दुपारी एक वाजता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीचे आयोजन मुंबई येथे केले आहे, त्यात यावर चर्चा केली जाणार आहे ,राज्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, तोडगा न निघाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे, तालुक्यातील गौण खनिज प्रकरणातील राज्य सरकारने चार तहसीलदार, चार मंडल अधिकारी व दोन ग्राम महसूल अधिकाऱ्यांना निलंबित केल्याने, पुणे जिल्ह्यातील महसूल विभागात खळबळ उडाली होती, याचा कामावर परिणाम आवक जावक बंद, नागरिकांनी घाराने कुठे मांडावीत? असा प्रश्न विविध दाखले देण्याचे काम बंद, रेकॉर्ड रूम बंद, नकला उपलब्ध नाहीत अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता त्यांचे म्हणणे ऐकू न घेता त्यांच्यावर अन्यायकारक पद्धतीने कारवाई करण्यात आली असून, याचा निषेध करत जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले असून, त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय सर्व तालुका आणि गाव पातळीवरील कामकाज ठप्प झालेले आहे, या आंदोलनात सुमारे अडीच हजार कर्मचारी अधिकारी सहभागी झालेले आहेत, महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निलंबना विरोधात शुक्रवार पर्यंत दि. 19 पर्यंत निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अधिकारी कर्मचारी महासंघाने राज्य सरकारला दिलेला असून, त्यानंतर राज्य सरकार झुकले असून ,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत राज्य अधिकारी व कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी दि. 18 डिसेंबर रोजी चर्चेसाठी बोलावले असून, त्यात तोडगा निघण्याची शक्यता आहे, राज्य सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास महासंघाने शुक्रवारपासून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, दरम्यान पुणे विभागातील पाचही जिल्ह्यातील सर्वच महसूल कार्यालयामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तिसऱ्या दिवशी कामकाज बंद आंदोलन कायम ठेवल्याने, सामान्यांची कामे रखडली असून, आज त्यावर तोडगा काढला जाणार आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments