Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदरचं विमानशेतकऱ्यांच्या जमिनीवर उभं राहणारं स्वप्न की राजकारण्यांचं आणि अधिकाऱ्यांच्या स्वार्थाचं विमानतळ?संतोष बबनराव हगवणे उदयोजक हगवणेवस्ती पुरंदर सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : पुरंदरमध्ये प्रस्तावित असलेलं विमानतळ हे केवळ विकासाचं प्रतीक नसून, ते एका मोठ्या संघर्षाचं जिवंत वास्तव आहे. एका बाजूला “विकास”, “रोजगार” आणि “प्रगती” यांची स्वप्नं दाखवली जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला पिढ्यान्‌पिढ्या जपलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी, त्यांच्या आठवणी, श्रम आणि अस्तित्व धोक्यात आले आहे. या जमिनी केवळ मातीचे तुकडे नाहीत; त्या शेतकऱ्यांच्या आयुष्याची श्वास-नाळ आहेत.राजकीय आश्वासनं आणि अधिकाऱ्यांची कागदी भाषा विकासाचं चित्र रंगवते, पण त्या चित्राच्या मागे दडलेली शेतकऱ्यांची वेदना अनेकदा दुर्लक्षित राहते. मोबदल्याचे आकडे, पुनर्वसनाचे आराखडे आणि कायदेशीर प्रक्रिया या सगळ्यांच्या पलीकडे एक प्रश्न उरतो, हा विकास नेमका कुणासाठी? शेतकऱ्यांच्या सहभागाशिवाय, त्यांच्या संमतीशिवाय उभा राहणारा विकास खरोखरच प्रगती ठरू शकतो का?“संघर्षाच्या कहाण्या सांगणाऱ्या पुस्तकांना शेवटचं पान नसतं.. कारण त्या पानांवर लिहिलेल्या वेदना कधीच विसरता येत नाहीत.” पुरंदरचा संघर्षही असाच आहे. हा केवळ विमानतळाचा मुद्दा नाही, तर शेतकऱ्यांच्या इमानाचा, त्यांच्या हक्कांचा आणि त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. पुरंदरचं इमान टिकवायचं असेल, तर विकास आणि न्याय यांच्यात समतोल साधणं अपरिहार्य आहे. अन्यथा, उड्डाण घेणारी विमानं जमिनीवरच्या अश्रूंवर उभी राहिल्याची जखम समाजाच्या मनावर कायमची कोरली जाईल. अशी सवॅ माहिती संतोष बबनराव हगवणे उदयोजक हगवणेवस्ती पुरंदर यांनी ही सवॅ माहिती प्रतिनिधीला दिली.

Post a Comment

0 Comments