पुरंदर तालुक्यातील सासवडला तुळशीच्या रोपाचे श्रीकृष्ण सेवा ट्रस्ट तर्फे वाटप सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : सासवडला संत सोपान महाराज समाधी उत्सव साजरा होत असून, या सोहळ्यामध्ये राख तालुका पुरंदर येथील 111 तुलसी वृंदावन श्रीकृष्ण सेवा ट्रस्ट यांच्या वतीने 200 तुळशीच्या रोपाचे मोफत वाटप करण्यात आल्याची माहिती श्रीकृष्ण सेवा ट्रस्टचे अध्यक्ष किसन महाराज चव्हाण यांनी दिली. सासवडला संत सोपान महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा होत आहेत ,निमित्त मोफत तुळशीच्या रोपांचा वाटपाचा कार्यक्रम झाला. सोपानदेव मंदिर येथे पालखी नगर प्रदक्षिणेला गेल्यानंतर वारकऱ्यांना तुळशीच्या रोपाचे वाटप करण्यात आले .अध्यात्मिक महत्त्व असलेली तुळशीची रोपे मोफत वाटप करून, तिचे जतन करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. सोपान महाराज समाधी दिन सोहळ्याच्या कार्यक्रमांतर्गत तुलसी वाटपाचा उपक्रम घेण्यात आला. या सोहळ्यानिमित्त अनेक विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत ,अशी सविस्तर माहिती श्रीकृष्ण सेवा ट्रस्टचे अध्यक्ष किसन महाराज चव्हाण यांनी ही प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments