पुरंदर तालुक्यातील शिवरी पाणीपुरवठा योजना रखडली असून; पुरंदर मधील नऊ गावांमध्ये पाणीटंचाईची भीती निर्माण जेजुरी प्रतिनिधी: मयूर कुदळे 2022 -2023 मध्ये सुमारे 27.12 कोटी रुपयांचा निधी मंजूर, पण प्रत्यक्षात काम संथ गतीने सुरू असताना, पुरंदर तालुक्यातील शिवरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम अद्यापही अपूर्ण अवस्थेमध्ये असल्याने, शिवरी, खळद, एखतपुर ,मुंजवडी, वाळुंज, मिळून बेलसर, साकुरडे, तक्रारवाडी, आदी गावांमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईची समस्या तीव्र होण्याची शक्यता निर्माण झालेली असून, केंद्र व राज्य शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणारी ही महत्त्वाकांक्षी योजना नागरिकांना नियमित व शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने मंजूर करण्यात आली होती ,मात्र प्रत्यक्षात योजना पूर्णत्वास न गेल्यामुळे, ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पिलाणवाडी तालुका पुरंदर येथील जलाशयावर आधारित ही प्रादेशिक योजना शिवरी, खळद, निळूज, वाळुंज, मुंजवडी, बेलसर, साकुर्डे, तक्रारवाडी आदि गावासाठी राबविण्यात येत आहे ,सण 2022-23 या आर्थिक वर्षात सुमारे 27.12 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला ,असतानाही प्रत्यक्ष कामाची गती अत्यंत संथ असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रशासनाकडून पिलाणवाडी येथील पंप हाऊस शिवरी येथील जलशुद्धीकरण केंद्र जलवाहिन्या व साठवून टाक्यांची कामे प्रगतीपथावर असल्याचे सांगितले जात असले ,तरी अनेक ठिकाणी कामे अर्धवट अवस्थेतच असल्याचे, ग्रामस्थांचे म्हणणे असून, काही गावांमध्ये पाणीपुरवठा सुरू झाला असला तरी ,अपुरा दाभ, अनियमित वेळापत्रक आणि वारंवार होणाऱ्या गळतीमुळे नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही, योजनेतील नियोजनातील त्रुटीवरही ग्रामस्थांनी बोट ठेवलेले असून ,आवश्यक ठिकाणी साठवण टाकेची उभारणी न झाल्याने, पाणी साठवणीत अडचणी येत आहेत, ठोस नियोजन असे नाही ,पाईपलाईन टाकताना स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता, काम करण्यात आल्यामुळे, रस्त्यालगद उघड्यावर पाईप पडलेले दिसून येतात, यामुळे अपघाताचा धोका निर्माण झालेला अजून ,शेती व वाहतुकीवरही त्याचा परिणाम होत आहे, वाडी वस्ती व दूरच्या भागापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी कोणतीही ठोस नियोजन नसल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे .उद्दिष्ट फक्त कागदावरच ,प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचविणे हे योजनेचे मुख्य उद्दिष्ट असले तरी ते अद्याप कागदावरच मर्यादित असल्याचे वास्तव आहे .योजनेतील रखडलेली कामे तातडीने पूर्ण करावीत अशी मागणी सर्व गावातील नागरिकाकडून करण्यात येत आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments