Hot Posts

6/recent/ticker-posts

आचार्य अत्रे पतसंस्थेचे अध्यक्षपदी शांताराम कोलते सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर व हवेली तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या, पुरंदर तालुक्यातील आचार्य अत्रे शिक्षक व शिक्षिकेतील सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अष्टापूर विद्यालयातील शांताराम कोलते यांची बिनविरोध निवड केली. या पतसंस्थेची स्थापना 2001 साली करण्यात आली असून ,ही सध्या या पतसंस्थेचे 103 सभासद आहेत, पतसंस्थेचे वसूल भाग भांडवल 30 208600 रुपये असून, कर्ज वाटप 12146657 रुपये आहे, सन मार्च 2025 अखेर एकूण नफा रुपये 32 85925 झाला आहे. मंगळवारी दि. 16 रोजी झालेल्या व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये झालेल्या ठरावानुसार सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पुरंदर अभ्यासिका अधिकारी यांनी संचालक मधून कोलते यांची निवड केली .यावेळी पतसंस्थेचे मार्गदर्शक आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांच्या हस्ते शांताराम कोलते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पतसंस्थेचे मावळते अध्यक्ष प्रदीप दुर्गाडे ,उपाध्यक्ष बाळासो खोमणे, पतसंस्थेचे विद्यमान सचिव चौरंगनाथ कामठे, खजिनदार अर्जुन शेडगे, ज्येष्ठ संचालक व पुणे जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले, जेजुरी महाविद्यालयाचे प्राचार्य धनाजी नागणे, संचालक किशोर भालेराव, प्रशांत जगताप, अशोक बाने, कैलास भोसले, अष्टापुर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष काळे, एखतपुर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील मेमाणे, पुरंदर तालुका सेवानिवृत्त शिक्षक संघाचे अध्यक्ष दिलीप पापळ आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments