Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कचेरीत हुतात्म्यांना मानवंदना सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर येथील मंगळवारी दि. 16 डिसेंबर रोजी जुनी तहसील कचेरी आवारातील पहिले महायुद्ध व दुसऱ्या महायुद्धातील हुतात्म्याच्या युद्ध स्मारकाजवळ 1971 चा युद्ध विजय दिवस साजरा करण्यात आला, त्यामध्ये 1971 च्या युद्धामध्ये वापरलेला गाडा टी -55 ट्रॉफी यासही मानवंदना देण्यात आली ,सासवड, आंबळे, जेजुरी, नारायणपूर ,राजेवाडी ,भिवरी तसेच तालुक्यातील माजी सैनिक प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, दलसेना, वायुसेना व नौदल मधील माजी सैनिक, माजी सैनिक सहकुटुंब, उज्वला खेनट व वैशाली जगताप हजर होत्या. यावेळी 'भारत माता की जय' 'वंदे मातरम 'अशा घोषणा देण्यात आल्या, माजी सैनिक प्रतिष्ठान हे पुरंदर तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम राबवत असतात ,असे माजी सैनिक किरण पुरंदरे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments