“इतिहास आणि विज्ञानाचा संगम " स्व.एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्री सिद्धेश्वर विद्यालय, नायगाव व राजुरी माध्यमिक विद्यालय, राजुरी या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टी व मा. बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरी पुणे येथे एक प्रेरणादायी व ज्ञानवर्धक शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली.येथील एकूण ११० विद्यार्थ्यांनी “विज्ञान सहल” अंतर्गत या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.ही शैक्षणिक भेट स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने, रिट संस्था पुणे व पर्सिस्टंट फाउंडेशन यांच्या विद्यमानाने आयोजित करण्यात आली होती. या सहलीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना भारताचा गौरवशाली इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन, कार्य, नेतृत्वगुण व राष्ट्रप्रेमाची मूल्ये यांची ओळख करून देणे तसेच आधुनिक विज्ञान व विमानशास्त्र क्षेत्रातील प्रगतीची माहिती देणे हा होता. शिवसृष्टीतील सजीव देखावे, प्रभावी इतिहास मांडणी व दृश्यरूप सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी विशेष रुची निर्माण झाली.मा.बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरीमध्ये विद्यार्थ्यांना भारतीय हवाईदलाचा इतिहास, हवाईदलातील रोजगार संधी, विमानतळाची रचना, हेलिकॉप्टर उड्डाणामागील विज्ञान, विमानावर कार्य करणारी बले, विमान नियंत्रित करणारे विविध भाग, भारतीय हवाई उड्डाणाचे जनक तसेच जुन्या विमानांपासून आधुनिक विमानांपर्यंत झालेल्या बदलांची सविस्तर माहिती देण्यात आली. प्रत्यक्ष प्रतिकृती व माहितीफलकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाचा अनुभवात्मक अभ्यास करता आला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे उपस्थित शिक्षकांनी समाधानकारक निरसन केले.या भेटीदरम्यान रिट संस्थेचे ट्रस्टी रवि भोसले , सचिन पाटील, सारंग गाडगीळ तसेच स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप, अंकुर शिवरकर उपस्थित होते. यासोबतच नायगाव विद्यालयाच्या प्राजक्ता झेंडे, अतुल रोकडे , आबा वाघमारे तसेच राजुरी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता पैठणकर, महादेव गायकवाड , गणेश कोलथे ,श्रद्धा इथापे यांच्यासह रिट संस्थेच्या शिक्षिका ज्ञानेश्वरी टेकवडे व हर्षदा गाड उपस्थित होत्या.ही शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरली असून शिक्षणासोबतच संस्कार, शिस्त व राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करणारी ठरली. सहल यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल विद्यार्थ्यांनी व पालकांनी स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान व सर्व सहकार्यांचे आभार मानले. भेटीनंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments