मार्गशीर्ष वैद्य अमावस्या निमित्त श्रीनाथ म्हस्कोबा वीर येथील मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आज मागॅशीषॅ वैद्य अमावस्या निमित्त मंदिरात भाविकांची दशॅनासाठी गर्दी पहाटे ४ वाजता देऊळवाडा दर्शनासाठी चालू करण्यात आला, ५ ते ६ मुख्य गाभारा बंद राहून, सकाळी ६ वाजता मुख्य गाभाराही दर्शनासाठी खुला करण्यात आला. दिवसभर दगडी कासवावर पारंपारिक गोंधळाचा कार्यक्रम चालू होता. सकाळपासून देवाला देवस्थान व भाविकामार्फत अभिषेक करण्यात आले. सकाळी १० वाजता दहीभाताची पूजा होऊन, देवाला नैवेद्य दाखविण्यात आला.दुपारी १२ वाजता धुपारती होऊन, मुख्य गाभारा बंद झाला व १.१५ मिनिटांनी पुन्हा दर्शनासाठी खुला करण्यात आला. रात्रौ. १०.३० वाजता देऊळवाडा दर्शनासाठी बंद करण्यात आला. आज मंदिरात महाप्रसादाचे आयोजन सदाबापू धोंडीबा सातव कै. शंकरराव धुमाळ व परिवार यांचेमार्फत आयोजन करण्यात आले होते.श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टमार्फत “श्रीनाथ म्हस्कोबा दिनदर्शिका” या बारमाही दिनदर्शिकेचे लोकार्पण करण्यात आले, यावेळी सर्व विश्वस्त, सल्लागार, मानकरी, सालकरी, पाटील व भाविक उपस्थित होते.देवस्थान ट्रस्टमार्फत भाविकांना स्वच्छ पाणी, दर्शनबारी, जादा होमगार्ड, लाईट, स्वयंसेवक यांची व्यवस्था करण्यात आली असून संपूर्ण मंदिर व्यवस्थापन येत्या यात्रा उत्सवाच्या तयारीत असल्याचे श्रीनाथ म्हकोबा एव्स्थान ट्रस्ट विश्वस्त / सल्लागार यांनी सांगितले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments