Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रा.दिपाली पांडुरंग मालुसरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विध्यापीठ,पुणे यांची मानव्य विद्याशाखेमधील इंग्रजी या विषयची पीए च.डी. पदवी प्राप्त सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे वाघिरे महाविद्यालय सासवड,येथील इंग्रजी विभाग व रिसर्च सेंटर मधून “नमिता गोखले व तह्मिम अनम यांच्या निवडक कादंबऱ्या मधील संरचनात्मक हिसाचार: एक तौलनिक अभ्यास’ (ए कॉम्पेरेटीव्ह स्टडी ऑफ स्ट्रकचरल व्याय्लन्स ऑफ इन द सेलेक्टेड नोवेल्स नमिता गोखले अंड तह्मिम अनम A Comparative Study of Structural Violence in The Select Novels of Namita Gokhale and Tahmima Anam) या विषयावर प्रबंध सदर केला होता. त्यांनी सदर प्रबंधामध्ये भारतीय व बांगलादेशमधील मधील सरंजामशाही, सामाजिक आत्मभान, आर्थिक व सामाजिक स्तरावरील सुप्त अवस्थेतील हिंसाचार व पिळवणूक याचे सूक्ष्म विश्लेषण केले आहे . सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संरचनांमुळे निर्माण होणाऱ्या अन्याय, विषमता आणि दडपशाहीचे साहित्यिक प्रतिबिंब या अभ्यासातून अधोरेखित करण्यात आले आहे. स्त्री-अनुभव, सत्ता-संबंध आणि सामाजिक वास्तव यांचा सखोल अभ्यास हे या संशोधनाचे वैशिष्ट्य आहे. त्यांना वाघिरे महाविद्यालय सासवड,येथील उपप्राचार्य व इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. संजय झगडे यांनी मार्गदर्शन केले. प्रा.दिपाली पांडुरंग मालुसरे या महाविद्यालयातील नव्यानेच सुरु झालेल्या इंग्रजी रिसर्च सेन्टर मधील इंग्रजी विषयामधील पीएच.डी.प्राप्त करणारी पहिलीच विद्यार्थिनीआहे. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके , पुणे विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य व मु सा. काकडे महाविद्यालायचे प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे व शरदचंद्र पवार महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. धनाजी नागणे तसेच महाविद्यालय प्रशासन, प्राध्यापकवर्ग, सहकारी व मित्रपरिवाराकडून त्यांचे अभिनदन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments