सासवड येथे संत सोपान काका महाराजांच्या समाधी उत्सवाची सांगता प्रचार पूजेने सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सकाळी काकडा आरती झाल्यानंतर, मंदिर स्वच्छ धुऊन काढण्यात आले. त्यानंतर सकाळी आठ वाजता श्रींना देवस्थानचे विश्वस्त श्रीकांत गोसावी यांच्या हस्ते पवमान अभिषेक झाला. त्यानंतर मंडपामध्ये हभप मस्कु महाराज कामठे यांची कीर्तन सेवा झाली. सकाळी 11 वाजता श्री गोपाळराव गोसावी, व्यवस्थापक हिरुकाका गोसावी, सीमा गोसावी, श्रीकांत महाराज गोसावी, मधुकाका गोसावी, चोपदार सिद्धेश शिंदे, अभय जगताप, विजय महाराज भिसे, बाळासाहेब जगताप,सुधाकर भाऊ गिरमे, राजेंद्र लांडगे यांच्या हस्ते श्रींना लिंबू साखर व गरम पाण्याने स्नान घालण्यात आले. देवाला गरम पाणी घालण्यासाठी सासवड व पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती. संध्याकाळी ह भ प पोमण गुरुजी यांचे सोपानदेव महात्म्य निरूपण झाले. त्यानंतर ह भ प अविनाश फडतरे यांचे प्रवचन झाले. रात्री आठ ते दहा या वेळेत ह भ प मुरारी महाराज नामदास यांची काढ्याची कीर्तन सेवा झाली. कीर्तनानंतर सर्व भाविकांना काढ्याचा प्रसाद वाटण्यात आला.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments