पुरंदर तालुक्यातील सासवड बस स्थानकामध्ये सांडपाण्यामुळे दुर्गंधीच दुर्गंधी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड बस स्थानकामध्ये मल निसकारण वाहिनी गेल्या दोन महिन्यापासून तुंबल्यामुळे प्रवाशांना सांड पाण्यातून वाट काढावी लागत आहे, यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरली असून, विद्यार्थी व प्रवासी कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तसेच बस स्थानक परिसरामध्ये होणाऱ्या खाजगी वाहनांच्या अवैध पार्किंग मुळे, एसटी बसेस ना येण्या जाण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे, प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे, याबरोबरच सीएनजी भरण्यासाठी येणारी खाजगी वाहने आणि रात्रीच्या वेळी होणारी असता व्यस्त पार्किंग यामुळे लांब पल्ल्याच्या बसेस स्थानकात येण्यास टाळाटाळ करीत आहेत, परिणामी प्रवाशांना रस्त्यावर उभे राहून बस थांबवाव्या लागतात, या दोन्ही समस्याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची प्रवासी मागणी होत आहे,याबाबत सासवड एसटी वाहतूक प्रमुख मोहिनी ढेरे यांनी सांगितले की, बस स्थानकामध्ये दुचाकी व चारचाकी वाहनांची अवैध पार्किंग केले जाते, या अडथळ्यामुळे आतापर्यंत दोन अपघात झाले असून, याबाबत सबंधित वाहन चालकावर दंडात्मक कारवाई करावी, तसेच येथे वाहतूक पोलीस कर्मचारी उपलब्ध करून, देण्याची मागणी पोलीस निरीक्षकांनाही केलेली आहे, मल निसारण वाहिनी तुंबल्यामुळे स्थानकामधील उपहारगृह व रसवंतीगृहाचे सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे, स्थानकात काँक्रिटीकरण असल्याने हे काम स्थानिक स्तरावर करणे अवघड आहे, याबाबत राज्य परिवहन विभागाच्या अभियंताकडे आठ दिवसापूर्वी पत्रव्यवहार करून त्यावरही दुरुस्तीची मागणी केलेली आहे. मोहिनी ढेरे वाहतूक प्रमुख सासवड.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments