Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील कोडित मध्ये महारुद्र अभिषेक सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: कोडीत येथे मार्गशीष महिन्यातील दर्श वेळा अमावशी निमित्त पहाटे श्रीनाथ म्हस्कोबा आणि देवी जोगेश्वरी देवांना महारुद्र अभिषेक घालण्यात आला ,आरती झाल्यानंतर दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले, त्यानंतर मंदिरामध्ये राजीवडे मंडळी, कोडीत ग्रामस्थ मंडळाच्या वतीने विविध फुलाची सजावट करण्यात आली होती, दिवसभर अमावश्या असल्यामुळे, भाविकांनी कोडीत येथील मंदिरात रांगा लावून दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी धूप आरतीची झाल्यानंतर मंदिर प्रदक्षिणा झाली, त्यानंतर नैवेद्य घेऊन पुन्हा मंदिर प्रदक्षिणा झाली, यावेळी गुलालाची उधळण करत "नाथ साहेबांचे चांगभलं जाग घोष" करण्यात आला. त्यानंतर मंदिरात छबिण्याचा कार्यक्रम होऊन, मंदिरात राजीवडे मंडळी कोडीत ग्रामस्थ मंडळाच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.

Post a Comment

0 Comments