Hot Posts

6/recent/ticker-posts

पुणे ग्रामीण पोलीसाआकडून दुहेरी खुनाचा उलगडा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: वेगवेगळ्या शहरांमध्ये एकाच महिन्यात दोन खून करून , लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींचा रक्तरणजीत प्रवास अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी थांबवला, गेल्या महिन्यात आहिल्या नगर जिल्ह्यातील जामखेड येथे खून करून, पुणे जिल्ह्यात आलेल्या या आरोपीने सासवडमध्ये दुसरी हत्या केली, त्यानंतर तो प्रसार झाला होता, मात्र सीसीटीव्हीच फुटेज तांत्रिक विश्लेषण आणि सातत्यपूर्ण तपासाच्या माध्यमातून पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने या दुहेरी खुणाचा पडदा पास केलेला असून, पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली, 9 डिसेंबर रोजी सासवड शहरातील न्यू आनंद वाहींनीच्या मागील बाजूमध्ये सुरू असलेल्या बांधकामाच्या इमारतीमध्ये जिन्याखाली राजू दत्तात्रय बोराडे (वय 38 )राहणार सासवड तालुका पुरंदर यांचा गळा चिरलेला मृतदेह आढळून आला, खून अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आल्याने, या घटनेने सासवड हादरून गेले होते ,मृतदेहांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनंतर सासवड पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली होती, घटनेचे गांभीर्य ओळखून अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी आरोपींना पकडण्याच्या सूचना केल्या होत्या, पथकाने घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मृत व्यक्ती सोबत दोन अनोळखी व्यक्ती घटनास्थळाकडे जात असल्याचे स्पष्ट झाले होते, याच फुटेज मधून तपासाची दिशा ठरली होती, संशयताचा शोध घेण्यासाठी कोंढवा हडपसर सह विविध भागात पथके रवाना करण्यात आली असताना, चौकशी दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी गोस्वामी याने काही आठवड्यापूर्वी जामखेड येथे पैशाच्या वादातून विकास मधुकर अंधारे 22 याचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती ,त्या घटनेनंतर तो पुणे जिल्ह्यात कामाच्या शोधात आला आणि सासवडमध्ये दारूच्या वादातून दुसरा खून केला त्यानंतर, फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी पकडले वाद वाढत गेल्याने, केला खून सासवडमधील आनंद वाईन्स येथे दारू खरेदीसाठी आलेला एक संशयित पोलिसांच्या नजरेत आला, चौकशीत त्याने सुरज प्रकाश बलराम निशाद अशी नाव सांगितले, मात्र उत्तरे विसंगत होती, सखोल चौकशीत निशाद याने साथीदार नीरज गोस्वामी यांच्यासह खून केल्याची कबुली दिली, त्यानंतर गोस्वामी यालाही ताब्यात घेण्यात आली ,दोन्ही आरोपी दारू पीत असताना वाद वाढत गेले आणि त्यातूनच त्यांनी हा खून केल्याचे समोर आले आहे, पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक कुमार कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments