Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी 11 प्रभागासाठी 11 टेबल तर दोन तासात होणार निकाल जाहीर सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी रविवारी दि. 21 रोजी होत आहे ,ही मतमोजणी टेबलावर चार फेऱ्यात होणार आहे ,साधारण दोन तासात संपूर्ण निकाल हती येईल ,अशी माहिती सासवड नगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी सतिश थेटे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी दिली. सासवड नगर परिषदेच्या सभागृहामध्ये मतमोजणी होणार आहे, यासंदर्भात शुक्रवारी दि.19 रोजी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे प्रशिक्षणही देण्यात आले ,यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सतिश थेटे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कैलास चव्हाण, सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस कुमार कदम आदी उपस्थित होते. सर्व उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे .नगराध्यक्ष पदासह अकरा प्रभागामधील 20 नगरसेवक पदासाठी 45 उमेदवार रिंगणात आहेत,2 डिसेंबर रोजी उत्साहात मतदान पार पडले होते, प्रभाग क्रमांक चार ब ची जागा आधीच बिनविरोध झाली आहे ,तर प्रभाग क्रमांक 11 ही जागा न्यायप्रविष्ठ आहे ,सासवड नगर परिषदेच्या सभागृहात रविवारी सकाळी दहा पासून ,मतमोजणीस सुरुवात होणार आहे ,मतमोजणीसाठी 11 प्रभागासाठी 11 टेबलची व्यवस्था केलेली आहे ,प्रत्येक टेबलवर दोन कर्मचारी व शिपाई तसेच प्रत्येक टेबलवर आणखी दोन राखीव कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली असून, ही प्रक्रिया एकूण चार फेऱ्यांमध्ये पूर्ण केली जाईल, मतमोजणीच्या नियमावली मध्ये आणि प्रक्रिये बाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून सर्व संबंधित उमेदवारांना सूचना पत्रके देण्यात आली आहेत.

Post a Comment

0 Comments