Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर विमानतळा संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मुंबई येथील बैठकीला; गेलेल्या महिला शेतकऱ्यांना पोलिसांनी बाहेरच रोखले सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर विमानतळा संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला गेलेल्या, पुरंदर मधील कुंभारवळण, वनपुरी, उदाचीवाडी, एखतपुर, मुंजवडी, खानवडी, पारगाव येथील महिला शेतकऱ्यांना पोलिसांनी बाहेरच रोखले, तर जिल्हाधिकारी यांच्या मर्जीतल्या व्यक्तींनाच फक्त प्रवेश दिला गेला, त्यामुळे मूळ शेतकरी लाडक्या बहिणी या मुंबई येथील विमानतळ संदर्भातील महिला शेतकरी म्हणजेच लाडक्या बहिणी मात्र वाऱ्यावर या मुख्यमंत्री, पुरंदरचे विद्यमान आमदार व जिल्हाधिकारी यांनी वाऱ्यावर सोडले, आत बैठकीसाठी महिलांना संधी दिली नाही, मात्र जिल्हाधिकारी व आमदार पुरंदरच्या यांच्या मर्जीतल्या व्यक्तींना बैठकीसाठी संधी देण्यात आली, ज्या अधिकाऱ्यांची विमानतळ संदर्भात नेमणूक झाली होती, त्यासाठी त्यातील अधिकारी सुद्धा उपस्थित नव्हते ,त्यांना सुद्धा संधी दिली नाही, विमानतळ बाधित महिला या गोरगरीब शेतकऱ्यांची भूमिका मांडण्यासाठी मीटिंगला गेल्या होत्या, परंतु बैठकीसाठी आत जाण्यासाठी कट रचून, बाजूला ठेवण्यात आले. त्यासाठी बाधित शेतकरी महिलांच्या लाडक्या बहिणी म्हणून घेणाऱ्या भगिनींचा या सरकारने ,आमदाराने जिल्हाधिकारी यांनी एक प्रकारे अपमानच केलेला आहे. जिल्हाधिकारी यांनी प्लॅनिंग पूर्वक हे कृत्य केलेले आहे, कारण सातही गावातील एजंट, दलाल, पुढारी हाताशी धरून, गावातील बैठक सरपंच ,शेतकरी यांनी घेऊन जी यादी दिली होती, त्यामध्ये नगण्य असे शेतकरी ,तर जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या मर्जीतल्या व्यक्तींना बैठकीसाठी संधी दिली, पुण्यातील 3 वेळा बैठक झाली त्यात सामान्य शेतकऱ्याला व्यथा आपल्या मांडण्यासाठी जशी संधी दिली नाही, तसेच मुख्यमंत्री, आमदार यांच्यासमोर मुंबई येथे शेतकऱ्याला सात विमानतळ बाधित काही बोलून दिले नाही, काही मागण्या मान्य झालेल्या नाहीत, शिक्का ,गुन्हा दाखल असलेल्या वर त्यावर फक्त मुख्यमंत्री यांनी सहमती दिली, तर रेट विषयी वाढवून देऊ असे म्हटले, तर जिल्हाधिकारी खोटी माहिती देऊन, खरे दाखवण्याचा जो काही प्रयत्न करत आहेत ,ना त्यासाठी सातही गावातील शेतकऱ्यांची मागणी एकच आहे जशी की संमती घेण्यासाठी आमच्याकडे आलात ना? तसे रेट ठरवण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्हीही ,पुरंदरचे विद्यमान आमदार व जिल्हाधिकारी यांनी आमच्या सातही विमानतळ बाधित गावात यावे ,म्हणूनच पाहू जसे की संमती देण्यासाठी भुलवले तसे सामान्य शेतकरी विमानतळासाठी आता भुलणार नाही, बैठकीत कुठल्याही प्रकारचे आश्वासन हे दिलेले नाही,शेतकऱ्यांनी पाच ते सहा कोटीची एकरला मागणी केलेली आहे, तेव्हा मुख्यमंत्री यांनी सांगितले की तसं पाहिलं तर 50 लाख रुपयांचीच मर्यादा आहे, त्यामुळे त्यावर बघून नियमानुसार काय होईल ते पहावे लागेल,लोकांचा यांच्यात शंभर टक्के तोटाच आहे ,असेही मुख्यमंत्री यांनी नमूद केले, त्यासाठी फक्त जिल्हाधिकारी यांना मुख्यमंत्री यांची शाबासकी ,पाठीवर थाप करून, घ्यायची होती, म्हणून कुणीही काही बोलायचं नाही म्हणून असे कृत्य स्वत: जिल्हाधिकारी यांनी करून आणले आहे, फक्त कुंभारवळण व खानवडी येथील एक ते दोन शेतकरी बोलले, बाकीच्यांना बोलण्याची संधी दिली नाही, मुंबई येथे मुख्यमंत्री यांनी फक्त सांगितले की, गुन्हे मागे घेऊ, शिक्का मारलेले त्यावर विचार केला जाईल, एकरी दराबाबत ठोस असा काही निर्णय झाला नाही, बघू असे फक्त सांगितले, पोपटपंची करणारे जिल्हाधिकाऱ्यांचे फक्त निव्वळ एजंट होते ,तेच बोलणारे परंतु त्यांच्या हाती सुद्धा जसे की,निराशाच पसरली आहे. सात गावातील विमानतळातून फक्त कुंभारवळण सोडले तर, सहा गावात पुढारीतालाल अधिकारी यांच्यात शेतकऱ्यांकडून जमिनी विकत घेतलेल्या आहेत, त्याचीच भाग भांडवल म्हणून जर पत्रकारांना पुरंदरच्या एजंट दमदाटी करत असतील, तर विमानतळ हा गाठ प्रामुख्याने पुढारी, दलाल, अधिकारी, एजंट मुळेच नांगर फिरवण्याचे काम सध्या तरी चालू आहे, जर एजंट ने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दमदाटी जर केली तर, पेपरमध्ये सहा गावातील पुढारी दलाल अधिकारी यांच्या किती जमिनी आहेत, ते नावानुसार प्रसिद्ध करावे लागेल त्यासाठी योग्य वेळीच जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या मर्जीतल्या सदस्यांना आवरा असा बाधित विमानतळ लाडक्या महिला शेतकरी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, जर सहा गावात शेतकऱ्यांची जमीन पुढारी ,दलाल, अधिकारी यांनी घेतलेली आहे ना ?मग सरकारने कुंभारवळण विमानतळातून वगळावे, कारण येथील शेतकऱ्यांनी जमीन पुढारी ,दलाल, अधिकारी यांना विकलेली नाही, शेती यांची 94% बागायत आहे, सासवड शहराशेजारी आहे ,मग विमानतळाला हा घाट कशासाठी ?अशी सुद्धा प्रतिक्रिया शेतकरी बांधव यांनी व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी सांगतात की ,मुख्यमंत्र्यांनी विमानतळाच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत ,खोटी माहिती जिल्हाधिकारी पसरवत आहेत ,गैरसमज निर्माण करत आहेत, सात बाधित विमानतळ गावातील शेतकऱ्यांची मागणी एकच आहे की, जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेऊन जेथे विमानतळ करण्याचा कट रचला आहे ना ,तेथे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री ,पुरंदरचे विद्यमान आमदार यांना बैठकीसाठी सात गावातील कोणत्याही एका ठिकाणी स्वत: जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन, विमानतळाचा रेट पहिला ठरवून दाखवावा .असा खडा सवाल लाडक्या महिला शेतकरी यांनी व्यक्त केलेला आहे. जिल्हाधिकारी यांनी आत्तापर्यंत पुण्यातील 3 वेळा बैठक संमती मुंबई येथील बैठक स्वतःच्या मर्जीतल्या व्यक्तींना हाताशी धरून शाबासकी ,मुख्यमंत्री यांची मिळवण्यासाठी आतापर्यंत हे कृत्य केलेले असून, परंतु ते साफ खोटं आहे, खऱ्या प्रवाहात यावे, जिल्हाधिकारी यांनी आशा लाडक्या बाधित महिला शेतकरी सातही गावातील प्रमुख महिलांनी आपली मुंबई येथील अपमानाच्या बद्दल झालेली व्यथा ही त्यांनी मांडल्या ,त्या संदर्भात त्यांनी सविस्तर अशी माहिती ही प्रतिनिधीला दिली.

Post a Comment

0 Comments